पुणे
पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. अशातच आता 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला अश्लिल व्हिडिओ दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.हा प्रकार १ जून २०२० ते १८ ऑगस्ट २०२४ या कालावधीत घडला आहे.
या प्रकरणी एका नराधमावर वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अनिरुद्ध सदाशिव डबीर(वय-४२, रा. अनमोल रेसिडेन्सी, अॅम्बीयंस हॉटेल, वाकड) असे या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १० वर्षाची मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील या नराधमाने तिचे कपडे काढून तिच्यावर बलात्कार केला आहे. त्यानंतर तिला अश्लिल व्हिडिओ दाखवून तुझ्यावर बलात्कार करेल, असे बोलला.
तसेच तू जर तुझ्या घरी सांगितले, तर मी तुला व तुझ्या भावाला मारून टाकीन अशी धमकी दिली. हा प्रकार मुलीने आईला सांगितल्यावर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.