त्यांच्या संस्कारामुळेच हे कुटुंब समाजासाठी प्रेरणादायी: प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे

त्यांच्या संस्कारामुळेच हे कुटुंब समाजासाठी प्रेरणादायी: प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे

वाघापूर दि.२८ (वार्ताहर)

विनायक गायकवाड (आंबळे) यांच्या  संस्कारामुळे  आज गायकवाड कुटुंब हे संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी  असल्याचे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले. ते विनायक गायकवाड यांच्या स्मृतिदिनी बोलत होते.


गेल्या एक वर्षांपूर्वी विनायक गायकवाड यांचे आकस्मित निधन झाले. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांवर खूप मोठा आघात झाला. त्या दुखा:तून कुटुंब अजूनही सावरलेले नसताना प्रथम स्मृती दिनानिमित्त त्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर आजही दुःख जाणवत होते.आंबळे गावामध्ये विनायक गायकवाड यांचा प्रथम स्मृतिदिन संपन्न झाला.

अत्यंत हलाखीच्या  काळातून आजपर्यंतचा गायकवाड  कुटुंबाचा प्रवास हा खरच प्रेरणादायी असल्याचे आंबळे गावचे माजी उपसरपंच सचिन दरेकर यांनी सांगितले. या कार्यक्रमाला नातेवाईकांसह बहुसंख्य मान्यवरांनी हजेरी लावली. वयाची ३७ वर्ष  त्यांनी जनता शिक्षण संस्था ठिकाणी सेवक म्हणून सेवा केली.

३७ वर्ष नोकरी करून २०१६  साली ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर अवघ्या सातच वर्षात त्यांचं दुःखद निधन झाले.आंबळे गावच्या माजी सदस्या संजीवनी गायकवाड यांचे ते पती तर आंबळे गावचे माजी सरपंच मंगेश गायकवाड यांचे ते वडील होते.

जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ता शेठ झुरंगे, पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पोमण, पंचायत समिती सदस्य सुनीता कोलते,माजी सरपंच संभाजी काळाने, झेंडेवाडी चे माजी सरपंच माऊली खटाटे,ऋषिकेश झेंडे, सुनील झेंडे, विठ्ठल शिशुपाल,राजेंद्र शिशुपाल,सुधाकर गायकवाड,गणेश लवांडे,अरुण महाडिक,जयश्री जगताप यांसहित अनेक मान्यवर उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *