दिल्ली: ११ जून २०२१ पासून सुरु झालेला युरो २०२१ चषक आता अंतिम टप्यात येऊन पोहचला आहे. येत्या बुधवार पासून सेमी-फायनल च्या सामन्याची सुरवात होणार असून या वेळेस इटली, स्पेन, इंग्लंड आणि डेन्मार्क यांनी सेमी-फायनल मध्ये धडक मारली आहे.
इटली आणि स्पेन या दोन बलाढ्य संघ मध्ये पहिला सामना होणार असून फ़ुटबाँल प्रेमींसाठी हि एक मोठी पर्वणीच म्हणावी लागेल. इटली आणि स्पेन हे युरोप मधील दोन बलाढ्य संघ आहेत. इटली संघाने जगात पहिल्या क्रमांकावर असलेल्या बेल्जियम संघा ला २-१ अश्या फरकाने पराभूत करून सेमी-फायनल गाठली. इटली ने बेल्जियम वर विजय मिळवून सलग ३२ वेळा पराभूत ना राहण्याचा विक्रम केला. आता स्पेन त्यांची विजयी घोडदौड खंडित करणार का याकडे पूर्ण जगाचे लक्ष राहील.
स्पेन संघा ने स्विझर्लंड ला १-१ बरोबरी नंतर पेनल्टी शूट-आऊट मध्ये ३-१ असे पराभूत करून सेमीफायलन मध्ये आपला प्रवेश निश्चित केला. हा सामना बुधवारी भारतीय वेळेनुसार रात्री ९:३० वाजता खेळवला जाईल.
दुसरीकडे इंग्लड संघाने युक्रेन ला ४-० ने हारवून आणि डेन्मार्क ने चेक-रिपब्लिक ला २-१ ने पराभूत करून सेमी फायनल मध्ये प्रवेश केला. इंग्लड आणि युक्रेन मध्ये सेमीफायनल चा सामना गुरुवारी भारतीय वेळेनुसार रात्री १२:३० वाजवता खेळवला जाईल.