इंग्लंड : संपुर्ण देशाचे लक्ष लागुन राहिलेल्या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्युझीलंडने भारताचा ८ गडी राखुन पराभव करत विजेतेपद पटकावले. चौथ्या डावात भारताने दिलेले १३९ धावांचे लक्ष्य न्युझीलंडने ८ गडी राखुन सहज पार केले. या सामन्यानंतर आता भारतीय संघाला ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात इंग्लंड संघासोबत पाच कसोटी सामन्याची मालिका खेळायची आहे.
अंतिम लढतीपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार टिम पेन याने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा संघ न्यूझीलंडचा सहज पराभव करेल, असे विधान टिम पेन याने केले होते. यानंतर मात्र त्याने भारतीयांची माफी मागितली आहे. ‘न्यूजटॉक जडबी’शी बोलताना टिम पेन म्हणाला की, कधी-कधी तुम्ही चुकीचेही सिद्ध होतात. माझा काही किवी प्रेक्षकांशी सामना झाला आणि त्यानंतर मी ऑन एअर येण्याचा निर्णय घेतला.
पुढे टीम पेन म्हणाला, न्यूझीलंडने दमदार खेळ केला आणि या संघाचा खेळ पाहणे नेहमीच शानदार असते असेही तो म्हणाला. तसेच त्याने न्यूझीलंडचा संघ आणि कर्णधार केन विलियम्सनचे आणि टीमचे कौतुकही केले आहे. न्यूझीलंडच्या संघाने शानदार क्रिकेट खेळले असेही तो म्हणाला.