नायगाव: पुरंदर मधील नायगाव, राजुरी, पांडेश्वर, रिसे, पीसे, आणि बारामतीतील भोंडवेवाडी, चांदगुडेवाडी आणि आंबी खुर्द या परिसरात होऊ घातलेल्या आंतराष्ट्रीय विमानतळाला नायगाव येथील चौंडकर वस्ती वरील शेतकऱ्यांनी मंगळवारी रात्री एकत्र जमून एकमुखाने विरोध दर्शवला. वस्ती वरील लोकांनी जमिनीचा एक इंच तुकडाही देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली.
मोठा लढा उभारण्याची केली तयारी!
काल चौंडकरवाडी वरील सर्व शेतकऱ्यांनी आपली जमीन विमानतळाला द्यायची नाही व तोपर्यंत मोठा लढा उभारान्याची तयारी करावी लागेल. याचबरोबर प्रत्येक वाडी-वस्तीवरील शेतकऱ्यांची मीटिंग घेऊन जास्तीत जास्त विमानतळ विरोधात कसे आपल्या सोबत राहून विमानतळाला कसा विरोध जास्तीत जास्त करता येईल या विषयावर चर्चा झाली. तसेच पुढील मिटिंग कानिफनाथ कड वस्ती येते आयोजित करण्यात आली आहे. विमानतळाला विरोध हा शेवटपर्यंत राहील आम्हाला आपल्या जमिनी अजिबात द्यायचे नाहीत असे सर्व शेतकरी व बांधवांचे म्हणणे आहे.
यापुढील प्रत्येक गाव गावातील प्रत्येक वाडी-वस्तीवर मीटिंग घेऊन या लढ्यांमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग कसा राहील यासाठी विमानतळ विरोधी संघर्ष समिती कार्यरत असणार आहे गट निहाय विमानतळ विरोधी शेतकऱ्यांचे सही मोहीम राबविण्यात येणार आहे.
आपल्या गावातील जवळपास 40 टक्के ऊस बागायत क्षेत्र झाले आहे मागील पाच वर्षांपूर्वी गावातील बहुसंख्य नागरिकांनी पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी आपल्या शेतात आणले आहे याचा आपल्याला भरपूर प्रमाणात फायदा झालेला असून ऊस क्षेत्र भरपूर प्रमाणात वाढले आहे, आपल्या पुर्व भागाचा दुष्काळी पुरंदर असा जो उल्लेख होता तो आता पूर्णपणे बागायती झालेला आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पिक पाणी मोहीम हातात घेऊन आमच्या भागातील शेतजमिनींचे नव्याने पीक पाहणी अहवाल शासनाला सादर करावेत अशी आमची मागणी आहे. विमानतळाच्या प्रकल्पाला शेवटच्या श्वासापर्यंत विरोध राहील असे मत महेश कड यांनी व्यक्त केले
नाही कोणाच्या बापाच्या जमिनी आमच्या हक्काच्या