अजित पवार यांची साथ घेतल्यामुळे भाजपचे पानिपत;अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपने स्वत:ची ब्रँड व्हॅल्यू कमी केली

अजित पवार यांची साथ घेतल्यामुळे भाजपचे पानिपत;अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपने स्वत:ची ब्रँड व्हॅल्यू कमी केली

पुणे

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये भाजपची पिछेहाट झाली. या राज्यांमध्ये भाजपला यश मिळाले नसल्यामुळे केंद्रात भाजप स्वबळावर येऊ शकली नाही. भाजपच्या या पराभवाचे पक्षीय पातळीवर विश्लेषण केले जात आहे. त्याचवेळी भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) भाजपने महाराष्ट्रात घेतलेल्या निर्णयाची चिरफाड करण्यास सुरुवात केली आहे.

अजित पवार यांची साथ घेतल्यामुळे राज्यात भाजपचे नुकसान झाले असल्याचे खडेबोल संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गेनायजरमधून सुनावण्यात आले आहे. आरएसएसचे सदस्य रतन शारदा यांनी हा लेख लिहिला आहे.लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत 2024 मध्ये महाराष्ट्रात भाजपचे मोठे नुकसान झाले आहे. या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सात तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळाली.

रतन शारदा यांनी कोणत्याही नेत्याचे नाव न घेता म्हटले की, भाजपने अशा काँग्रेस नेत्याचा पक्षात समावेश केला, ज्याने उघडपणे भगव्या दहशतवादाबद्दल विधान केले होते. त्याने २६/११ ला आरएसएसचे षड्यंत्र म्हटले होते. तसेच आरएसएसला दहशतवादी संघटना म्हटले होते. यामुळे आरएसएस समर्थक खूप दुखावले गेले. भाजपमध्ये आलेल्या या नेत्यांनी त्यांच्या या विधानावर खेद व्यक्त केला नाही किंवा माफी मागितली नाही.

महाराष्ट्रातील या खेळीमुळे अनेक वर्ष काँग्रेसी विचारधारेला विरोध करणारा सच्चा भाजप समर्थक दुखावला. भाजप पार्टी विथ डिफरन्स अशी ओळख सांगतो, परंतु भाजपची ओळख पार्टी विदाऊट एनी डिफरन्स अशी झाली आहे.अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपने स्वत:ची ब्रँड व्हॅल्यू कमी केली. त्यामुळे महाराष्ट्रात पक्षाला झटका बसला आहे. भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेकडे बहुमत होते, मग अजित पवार यांना घेण्याची गरज काय होती? असा प्रश्न त्या लेखात विचारण्यात आला आहे.

भाजपमधील नेते हे त्यांनाच राजकीय वास्वत कळते या मोठ्या भ्रमात राहिले आहेत. भाजपने निवडणुकीत सहकार्य करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांशी संपर्कही केला नाही. त्यांनी नि:स्वार्थपणे काम करणाऱ्या जुन्या समर्पित कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले.ऑर्गेनायजरमधून भाजपला आरसा दाखवला आहे. लोकसभा निवडणुकीत जे काम केले आहे. त्याचा हाल हवाला दिला आहे.

आयारामगयारामांना घेऊन भाजपने राज्यातील वर्चस्व कमी केले आहे. भाजप हवेत वावरत होती. जमिनीवरचे कार्यकर्ते अन् संघाशी संपर्क साधला गेला नाही. मोदींचा चेहरासमोर ठेवून निवडणूक समोर ठेवून निवडणूक लढली गेली ही चूक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *