Politics news

Big Breaking!!!!!!बारामतीची जागा अपक्ष म्हणून मी एक हजार टक्के जिंकली असती : विजय शिवतारे

पुणे देशात नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत अनेक मतदारसंघासाठी अटीतटीच्या लढती झाल्या. परंतु संपूर्ण महाराष्ट्राचे व देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार...

अजित पवार यांची साथ घेतल्यामुळे भाजपचे पानिपत;अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपने स्वत:ची ब्रँड व्हॅल्यू कमी केली

पुणे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये भाजपची पिछेहाट झाली. या राज्यांमध्ये भाजपला यश मिळाले नसल्यामुळे केंद्रात भाजप स्वबळावर येऊ शकली नाही. भाजपच्या या पराभवाचे पक्षीय पातळीवर विश्लेषण केले जात आहे. त्याचवेळी भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक...

“मला पदरात घ्या” “या” नवनिर्वाचित खासदारांचा अजितदादांना फोन?शरद पवारांना मोठा धक्का?

पुणे महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणडे बीडचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केल्याची माहिती समोर येत आहे.त्यामुळे शरद पवार गटाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे हे अजित पवार...

Big Breaking!!!!!जयंत पाटील खुर्ची सोडेना,फक्त तारखा सांगतात,रोहित पवार पुढच्या वर्धापनदिनी अजित दादांसारखा निर्णय घेतील

पुणे ज्या ज्या वेळी प्रदेशाध्यक्ष बदलण्याची वेळ आली त्या त्या वेळी जयंत पाटील यांनी ती मारुन नेली. सोमवारच्या वर्धापनदिनाच्या सभेतसुध्दा त्यांनी वेळ मारुन नेली. विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आपण हे पद सोडू, असे पाटील यांनी जाहीर केले असून असेच सुरू राहिले...

३१ जुलै २०२१ पर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार – ना. अजितदादा पवार

३१ जुलै २०२१ पर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची महत्त्वाची आणि मोठी घोषणा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी आज विधानसभेत केली. एमपीएससीचा विद्यार्थी स्वप्निल लोणकरच्या आत्महत्या प्रकरणावर बोलत असताना अजितदादा म्हणाले की, ही घटना अतिशय वेदनादायी अशी आहे. अशी...

विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अध्यक्षांच्या दालनात केली धक्काबुक्की – अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक यांचा आरोप

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून सुरूवात झाली. आज पहिल्या दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अध्यक्षांच्या दालनात धक्काबुक्की केल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक यांनी केला आहे. भास्कर जाधव हे तालिका अध्यक्ष म्हणून काम पाहत असताना हा प्रकार घडल्याचे...

महागाईच्या विरोधात केंद्र सरकारचा निषेध व रास्ता रोखो आंदोलन

आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पुरंदर यांच्या तर्फे सासवड या ठिकाणी महागाईच्या विरोधात केंद्र सरकारचा निषेध व रास्ता रोख आंदोलन करण्यात आले. आधीच महागाई ने जनतेचे कंबरडे मोडले असताना केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल चे भाव वाढवून सर्वसामान्यांन वर आर्थिक बोजा...

कुठल्याही परिस्थितित विमानतळ होऊ देणार नाही

विमानतळ विरोधी समितीची राहुल कुल यांच्याकडे धाव पुणे पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील नव्याने होऊ घातलेल्या छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळास स्थानिक ग्रामस्थांचा तिव्र विरोध असुन हे विमानतळ होऊ नये म्हणुन विमानतळ विरोधी संघर्ष समितीने दौंड तालुक्याचे भाजपचे आमदार राहुल कुल...

विमानतळ विरोधात शेतकरी राबविणार सही मोहीम- विमानतळाला शेवटच्या श्वासापर्यंत विरोधच..

नायगाव: पुरंदर मधील नायगाव, राजुरी, पांडेश्वर, रिसे, पीसे, आणि बारामतीतील भोंडवेवाडी, चांदगुडेवाडी आणि आंबी खुर्द या परिसरात होऊ घातलेल्या आंतराष्ट्रीय विमानतळाला नायगाव येथील चौंडकर वस्ती वरील शेतकऱ्यांनी मंगळवारी रात्री एकत्र जमून एकमुखाने विरोध दर्शवला. वस्ती वरील लोकांनी जमिनीचा एक इंच...

ओबीसींच्या आरक्षणास महाविकास आघाडी व नाकर्ते राज्य सरकारचं जबाबदार – पंकजाताई मुंडे आक्रमक।

आरक्षण मिळविल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही , पंकजा मुंडे यांचा इशारा…. ओबीसी आरक्षणासाठी भाजपा आक्रमक  पुणे:राज्यभरात भाजप चक्का जाम आंदोलन करत आहे. पुण्यामध्ये पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आंदोलन पार पडले. यावेळी, ‘जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत राज्यात निवडणुका होऊ देणार नाही’, असा इशारापंकजा मुंडेंनी दिला. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले आहे. हे सरकार सत्तेत आल्यानंतर इम्पिरिअल डेटा सादरकरू शकले नाही. गेल्या 15 महिन्यांपासून या सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही, अशी टीकाही पंकजा मुंडेंनी केली. ‘मन मोठे ठेवून निर्णय घेता आले पाहिजे. पण, महाविकास आघाडी सरकार असे कोणतेही निर्णय घेत नाही. त्यामुळेजनता या सरकारला माफ करणार नाही. ओबीसी समाजातील लोकांसोबत भाजप आहे, त्यामुळे आरक्षण मिळवूनदेणारच, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. ‘जोपर्यंत स्थानिका स्वराज संस्थेत ओबीसी आरक्षण जाहीर होत नाही, तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही. पाचजिल्ह्यात निवडणुका जाहीर झाल्या आहे. हे सरकार निवडणूक आयोगाला पत्र देत आहे. पण, यांनी जर विरोधी पक्षालासोबत घेऊन एक समिती स्थापन करून निवडणूक आयोगाला विनंती केली तर निवडणूक पुढे ढकलता येतील. पण हेसरकार आरक्षण रद्द होण्याची वाट पाहत आहे, अशी टीकाही पंकजा मुंडेंनी केली. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी चक्काजाम केल्यानंतर परळीमध्ये खासदार प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत चक्काजाम आंदोलनसुरू आहे. चक्काजामला जाण्यापूर्वी खासदार प्रीतम मुंडे यांनी ओबीसीचे नेते स्व गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचेदर्शन घेतले. बीड जिल्ह्यात तब्बल 24 ठिकाणे चक्का जाम आंदोलन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये तगडापोलिस बंदोबस्त केला असून आंदोलनामध्ये अनुचित प्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याचेप्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. चक्काजाम नंतर राज्य सरकारनेओबीसी आरक्षणा संदर्भात योग्य निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलन तीव्र असेल असाइशारा खासदार प्रीतम मुंडे यांनी दिला आहे.

ओबीसीच्या आरक्षणासाठी कात्रज येथे चक्काजाम आंदोलन.

पुणे महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले. ओबीसींवरचा हा अन्यायभारतीय जनता पक्ष कदापीही सहन करणार नाही. म्हणून आज राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यातही आम्ही कात्रज चौक येथे राष्ट्रीय चिटणीस मा. पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत...

माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा गृहकलह चव्हाट्यावर विजय शिवतरे यांना हृदय विकाराचा झटका….

सासवड: शिवसेनेचे नेते, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवतारे यांची मुलगी डॉ. ममता शिवदीप लांडे आणि त्यांच्या आई व विजय शिवतारे यांच्या पत्नी मंदाकिनी यांच्या फेसबुक पोस्टमधून हे वाद उघड झाल्याने राजकीय क्षेत्रात शिवतारे दोन...