हृदय पिळवून टाकणारी घटना!!!!!गरम तेलाच्या कढईत पडून सहा वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

हृदय पिळवून टाकणारी घटना!!!!!गरम तेलाच्या कढईत पडून सहा वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

नाशिक

गरम तेलाच्या कढईत पडून 6 वर्षांच्या चिमुकलीचा भाजून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नाशिकच्या सटाणा तालूक्यातील लखमापूर येथे ही घटना घडली आहे. वैष्णवी पवार असं मृत मुलीचं नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, खाद्य पदार्थ विक्रेते समाधान निंबा पवार हे आपल्या व्यवसायासाठी लागणारे खाद्य पदार्थ तयार करत होते.

दरम्यान त्यांचा स्वयंपाकाचं काम संपल्यानंतर त्यांनी गरम तेलाची कढाई खाली उतरून ठेवली. त्यानंतर दुसऱ्या कामात ते व्यस्त होते. एकीकडे ते कामात व्यस्त असताना त्यांची सहा वर्षाची मुलगी वैष्णवी खेळता खेळता तोल जाऊन गरम असलेल्या तेलाच्या कढाईत जाऊन पडली. मुलगी कढईत पडल्याचं लक्षात येताच समधान यांनी तिला कढाईतून बाहेर काढले.

त्यानंतर भाजलेल्या वैष्णवीला त्यांनी स्थानिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.वैष्णवी या घटनेत गंभीररित्या भाजली होती. त्यानंतर तिला अधिक उपचारासाठी नाशिक येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. काल या प्रकरणी सटाणा पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *