पुरंदर
माजी मंत्री विजय शिवतारे यांनी काल परवा एक पत्रक प्रसिद्ध केले आणि त्यामध्ये त्यांच स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले की पारगाव वगळा आणि बाकी सहा गावात ( वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपुर, मंजवडी आणि खानवडी ) विमानतळ करा ह्या तुमच्या भुमिकेचा जाहिर निषेध करतो.
विमानतळासाठी जमीन द्यायची अथवा नाही हे आम्ही शेतकरी ठरवू तुम्ही प्रस्ताव द्यायची गरज नाही असे एक शेतकरी म्हणून आमचे म्हणने असल्याचे मत संभाजी ब्रिगेड चे जिल्हा उपाध्यक्ष व विमानतळ विरोधी संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष संतोष हगवणे यांनी मांडले.
गेल्या चार वर्षांपासून विमानतळाच्या नावाने राजकारण करुन स्वताची पोळी भाजून घेण्यासाठी चाललेला उद्योग आहे.गेल्या चार वर्षांत एकदा तरी स्थानिक शेतकऱ्यांसी प्रत्येक्षात आपण चर्चा का केली नाही. आपल्याला गरजेचे वाटले नाही.आता येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून तुम्ही करता परंतु शेतकरी म्हणून तुमच्या या भुल थापांना आम्ही बळी पडणार नाही.
गुंजवणी च्या पाण्यावरून राजकारण करून आपण मंत्री पद मिळवलं होतं.एका सहीवर आलेल गुंजवणी च पाणी तुम्ही मंत्री झाल्यावर का थांबल आणि जर गुंजवणी च पाणी पुरंदर तालुक्यात येणार होते तर मग तुम्ही तुमच्या साखर कारखाना अहमदनगर ला का नेला.तुम्हाला जर वाटत विमानतळामुळेच तालुक्याचा विकास होणार आहे, असे असले तर तुमच्या मुलांच्यानावावर राख नावळी येथे हजारो एकर जमीन खरेदी केलेल्या जागेचा प्रस्ताव विमानतळासाठी द्यावा जेणेकरून अल्प भूधारक शेतकरी भुमीहिन होणार नाही आणि तालुक्याचा विकास होईल असे परखड मत संतोष हगवणे यांनी मांडले आहे.