स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी पर्वाचे औचित्य साधुन विठ्ठलतात्या जगताप यांच्याकडुन दोनशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासहित दप्तराचे वाटप

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी पर्वाचे औचित्य साधुन विठ्ठलतात्या जगताप यांच्याकडुन दोनशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासहित दप्तराचे वाटप

माळशिरस

पुरंदर तालुक्यातील आंबळे याठिकाणी असणार्या श्री शिवाजी विद्यामंदिर या प्रशालेत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी पर्वाचे औचित्य साधुन आंबळे गावचे उद्योजक विठ्ठल गंगाराम जगताप व सेवा सहयोग संस्था पुणे यांच्या कडुन गावातील तब्बल दोनशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासहित दप्तराचे वाटप करण्यात आले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आंबळे हायस्कुल याठिकाणी प्रथम झेंडावंदन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापक निना चव्हाण यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.

आगामी काळात शाळेसाठी शक्यतेवढी मदत करणार असुन जर या शाळेतील विद्यार्थी हा दहावीत पुरंदर तालुक्यात पहिला आला तर त्याला पाच हजार रुपये बक्षीस व एक मेडल देऊन प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानित करणार : संतोष एकनाथ जगताप,अध्यक्ष,स्व.एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान

त्यानंतर राजेंद्र दरेकर,राहुल कुंजीर,संतोष काका जगताप या मान्यवरानी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेचे उपशिक्षक सुनिल हैंद्रे यांनी केले तर प्रासताविक उपसरपंच सचिन दरेकर यांनी केले तसेच आभार शाळेच्या मुख्याध्यापक निना चव्हान यांनी मानले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे स्वर्गीय एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री संतोष काका जगताप,आंबळे गावच्या सरपंच राजश्री थोरात माजी सरपंच शशिकांत भाऊ दरेकर,मा.सरपंच मंगेश गायकवाड, शाळा व्यवस्थापन समिती जगताप वस्तीचे अध्यक्ष संदिप जगताप,गुलाब जगताप,माजी उपसरपंच नामदेव थोरात,महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष श्री शिवाजी दादा सणस,ग्रामपंचायत सदस्य अजित जगताप, दिलीप जगताप,दिलीप जगताप सर,माजी सैनिक निलेश बधे,विविध विकास कार्यकारी सोसायटी चेअरमन संजय जगताप,पुरंदर तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उपाध्यक्ष पल्लवी दरेकर,प्रमोद दरेकर,तुषार दरेकर,तसेच दरेकर मळा,जगताप वस्ती,रामवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक शिक्षक तसेच श्री शिवाजी विद्यामंदिर प्रशाला प्राचार्य निना चव्हाण त्यांचे सर्व शिक्षक वृंद कर्मचारी तसेच गावातील इतर सन्माननीय ग्रामस्थ तरुण सहकारी व पालक उपस्थित होते यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरती आनंद ओसंडून वाहत होता गावातील माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *