पुरंदर
फिर्यादी -सौ. माधुरि अजित बाठे, वय 57 वर्षे, व्यवसाय गृहीणी, रा. आग्री बीआयटी चाळ, 25/9, माधवराव गांगनमार्ग, मुंबई 400011, मुळ कोडीत यांच्या फिर्यादीनुसार 4/2/2023 रोजी सकाळी 11ः00 वा. ते 11ः30 वा.चे दरम्यान मौजे कोडीत, ता. पुरंदर, जि. पुणे. गावचे हद्दीत ‘‘तुळाजी बुवा ’’ मंदिराचे आवारात मी देव दर्षन घेत असताना माझ्या गळ्यातील राणीहार चोरीस गेला.
समक्ष सासवड पोलीस स्टेशन येथे हजर राहुन फिर्यादी जबाब लिहुन देते की,मी वरील ठिकाणी माझे पती अजित नारायण बाठे, मुलगा मयुरेश,आश्विन व सुन मोहिनी मयुरेष बाठे असे एकत्रात राहणेस असून आमचा सदर ठिकाणी वडापाव विक्रीचा व्यवसाय असून त्यावर आम्ही कुटूंबाचा उपजिवीका करतो. मी दिनांक 6/04/2016 रोजी आमचे येथे राहणारे सोन्याचे कारागीर बंन्सी सिदाम पत्रा याचेकडून एक 55.250 ग्रॅम वजणाचा सोन्याचा राणी हार बनवून विकत घेतला होता.
तारीख 4/2/2023 रोजी नाथ म्हस्कोबा देवाची वीर, ता. पुरंदर, जि.पुणे येथे यात्रा असल्याने मी, माझे पती अजित नारायण बाठे, मुलगा मयुरेश, माझा चुलत दिर तानाजी अंकुश बाठे व अनिल नारायण बाठे व आमचे ओळखीचे सुबोध तिनप्पा शानबाग असे सर्व पहाटे 01ः00 वा.चे सुमारास निघालो. आम्ही मुंबई – पुणे – बोपगाव मार्गे आमचे घरी कोडीत, ता. पुरंदर, जि.पुणे. येथे दिनांक 4/2/2023 रोजी पहाटे 04ः45 वा. पोहचलो. आम्ही सर्वांनी थोळा वेळ आराम केला. त्यानंतर मी देवाना नैवद्य केला. त्यानंतर आम्ही वरिल सर्व मिळून सकाळी 11ः00 वा.चे सुमारास कोडीत येथील तुळाजी बुवा मंदिरात गेलो. तेथे नाथ मस्कोबा देवाचे पालखीचे दर्षन घेवून तुळाजी बुवा मंदिरात देवदर्षन केले. त्यावेळेस मदिरात खुप मोठया प्रमाणात गर्दी होती. मी 11ः30 वा.चे सुमारास मंदिरातुन बाहेर पडले. तेव्हा माझे पती अजित नारायण बाठे यांनी मला तुझ्या गळ्याातला राणी हार कोठे गेला असे विचारले.
मी माझे गळ्यााला हात लावला तर मला माझ्या गळयातील राणी हार दिसला नाही. म्हणून मी, माझे पती, मुलगा व दिर यांनी सर्वांनी मिळून माझे सोन्याचे राणीहारचा मंदिरात शोध घेतला. परंतु तो मिळून आला नाही. तेव्हा माझी खात्री झाली की, कोणीतरी अज्ञात चोरटयाने माझे गळयातील सोन्याचा राणीहार कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेला आहे. माझे चोरीस गेलेला सोन्याचे राणीहारचे वर्णन खालील प्रमाणे-2,75,000/- रु. किंमतीचा एक सोन्यचा राणीहार 55.250 ग्रॅम वजनाची 2,75,000/- रु. येणे प्रमाणे वरील वर्णनाचा व किंमतचा सोन्याचा राणीहार कोणतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली आहे.
त्यानंतर आम्ही आमचे घरी मुंबई येथे गेलो. व आज रोजी अज्ञात चोरटया विरुध्द् तक्रार देणेस आलो आहे.तरी दिनांक 4/2/2023 रोजी सकाळी 11ः00 वा. ते 11ः30 वा.चे दरम्यान मौजे कोडीत, ता. पुरंदर, जि. पुणे. गावचे हद्दीत ‘‘तुळाजी बुवा ’’ मंदिराचे आवारात मी देव दर्षन घेत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यााने माझे गळयातील वरील वर्णनाची व किंमतीची सोण्याचा राणी हार माझे संमत्ती षिवाय मुद्दाम लबाडीचे इराद्यााने स्वतःचे आर्थिक फायदया करिता चोरुन नेला आहे. म्हणून माझी त्या अज्ञात चोरटया विरुध्द् तक्रार आहे. माझी मानसिकस्थिती बरी नसल्याने मी पोलीस स्टेशनला न येता मुंबईला परत गले. व आज रोजी परत येवून तक्रार देणेस आली आहे.
पुढील तपास पोलिस निरिक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली चिखले करित आहेत.