पुणे
ग्रामविकास विभागाच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौंड तालुक्यातील दौरा निश्चित झाला आहे. हा दौरा 30 सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे.या दौऱ्याच्या अनुषंगाने पाटस (ता. दौंड) येथे निवडण्यात आलेल्या कार्यक्रमस्थळाची पाहणी नुकतीच करण्यात आली.
या पाहणी दरम्यान कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुरक्षेची तयारी, वाहतूक व्यवस्थापन, कार्यक्रमस्थळाची संरचना तसेच नागरिकांच्या सोयी-सुविधांचा सर्वांगीण आढावा घेण्यात आला.
पाहणीसाठी आमदार राहुल कुल, विभागीय आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी, पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, जिल्हा परिषद पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर पोलीस अधीक्षक (बारामती) गणेश बिरादार, दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, प्रांताधिकारी रेवणनाथ लबडे, तहसीलदार अरुण शेलार, गटविकास अधिकारी अरुण मळभर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
या दौऱ्यामुळे दौंड तालुक्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले असून, स्थानिक प्रशासनाने तयारीला सुरुवात केली आहे. कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी संबंधित विभागांतर्फे नियोजनबद्ध काम सुरु असल्याची माहिती मिळत आहे.