नाशिक
सरपंच सेवा महासंघा मार्फत विविध गावांच्या सरपंचांना शासनाच्या प्रत्येक योजनांचा,गावच्या सर्वांगीण विकासासाठी फायदा व्हावा यासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन आगामी काळात देण्यात येणार आहे.संघाच्या संघटनात्म्क बांधणीसाठी पात्र विभागीय अध्यक्ष व जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात आली असून राज्यभरात सरपंच सेवा महासंघाची रचनात्मक बांधणी करण्यात आली आहे.
राज्यातील आजी माजी सरपंच हे सरपंच सेवा महासंघात महत्वाचा दुवा असणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्या न्याय हक्कासाठी एकत्रित येऊन ग्राम विकास घडावावा आणि त्यातून गावातील विविध प्रश्न, समस्या सुटाव्यात यासाठी सरपंच सेवा महासंघाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे यांनी दिली. आगामी काळात विविध मार्गदर्शन शिबिरे, व्याख्याने यासह सरपंच सेवा महासंघाचे अधिवेशन घेऊन ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तींचा सुसंवाद घडवून आणण्याचा आमचा मानस असल्याचे पुरुषोत्तम घोगरे यांनी बोलतांना व्यक्त सांगितले.
यावेळी राज्य मार्गदर्शक शशिकांत मंगळे, कार्याध्यक्ष माधवराव गंभीरे, उपाध्यक्ष बाळासाहेब मस्के, सचिव सुनील राहाटे, राज्य संपर्कप्रमुख राहुल उके, संघटक अन्नासाहेब जाधव, सल्लागार हनुमंत सुर्वे, महिला उपाध्यक्षा सौ.वदना गुंजाळ, संघंटिका सौ.ज्योती अवघड,राज्य प्रवक्ते दिनेश गाडगे,कोअर कमिटी अध्यक्ष पंजाबराव चव्हाण,सतिश चर्हाटे, राज्य निरीक्षक राजकुमार मेश्राम, कोष्याध्यक्ष सदाशिव ढेंगे, राज्य प्रसिद्धी प्रमुख मंगेश तायडे, राज्य सोशल मीडिया अध्यक्ष भाऊसाहेब कळसकर , सरपंच माझा चे संचालक रामनाथ बोर्हाडे, राज्य कार्यकारणी सदस्य सतीश साखरे, सागर कळसकर, सचिन नाडमवार, किशोर धांमदे उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
यामध्ये विभागीय अध्यक्ष म्हणून अमरावती विभागीय अध्यक्ष कपील देवके,सौ.जया येवले (महिला), नागपूर विभागीय अध्यक्ष जितेंद्र गोंडाणे, औरंगाबाद विभागीय अध्यक्ष कल्याण साबळे, पुणे विभागीय अध्यक्ष चंद्रकांत गव्हाणे, नाशिक विभागीय अध्यक्ष दत्तात्रय वाघचौरे, सौ. नयना पाटील (महिला), कोकण विभागीय अध्यक्ष जानु गायकर आदींची नियुक्ती करण्यात आली तर जिल्हाध्यक्ष पदी रणजित तिडके, सौ.शांताबाई अभ्यंकर (महिला) (अमरावती), महेंद्र गाढवे (अकोला), ज्ञानदेव ढगे (बुलढाणा), सौ.वर्षाताई निकम (यवतमाळ), दादाराव बहुटे (वाशिम),नागपूर विभाग सौ.प्राजंल वाघ (नागपूर), संदीप ठाकरे (वर्धा), यादव मेंघरे (भंडारा), शसेद्र भगत (गोंदिया), हेंमत लांजेवार (चंद्रपूर), प्रशांत आत्राम, योगेश नागतोडे (गडचिरोली),औरंगाबाद विभाग सचिन गरड (औरंगाबाद), योगेश शेळके (बीड), सय्यद तारेखअली ताहेरअली, सौ.ज्योती राउत (महिला) (जालना), नागेश बनसोडे (उस्मानाबाद), पंकज शेळके (लातूर), पंजाबराव चव्हाण (नांदेड), रुपेश सोनी (हिंगोली), सोपानराव आरमळ (परभणी) कोकण विभाग जावेद चिखलीकर (ठाणे), संजय पवार (पालघर), राजेंद्र टकले (रायगड), कासद दलवाई (रत्नागिरी), प्रेमांनद देसाई (सिंधुदुर्ग),नाशिक विभाग बाळासाहेब मस्के (नाशिक), महेंद्र पाटील (धुळे), मनोज चौधरी (नंदुरबार), उमेश साळुंखे (जळगाव), श्रीनाथ थोरात, अनिल शेदाळे (अहमदनगर),पुणे विभाग दिपक गावडे, सौ.क्रांतीताई गाढवे (महिला) (पुणे), प्रविण घोरपडे (सातारा), रणजित माने (सांगली), सौ. दिपाली गुरव (सोलापूर), दिंगबर गुरव (कोल्हापूर) आदींची नियुक्ती करण्यात आली.
तुमच्या कार्याला सलाम…! मला पण संघटने मध्ये कजुटीने काम करायचे आहे…. मी इरय्या स्वामी (ग्रा.प.सदस्य शिरशी ग्रुप) ता: अक्कलकोट जि: सोलापूर तर कृपया मी काम करण्यास इच्छुक आहे….!
🙏🏻🙏🏻