पुरंदर
पुरंदर तालुक्यातील कऱ्हा नदीचे पात्र अवैध वाळू उपस्याने वाळवंट बनले आहे.ठराविक कालावधी पूर्ती प्रशासनाकडून पांचानाम्याचा दिखाऊपणा केला जात आहे.संपूर्ण कऱ्हा नदी पात्राचा पंचनामा कधी होणार असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
पुरंदर तालुक्यातील नाझरे जलाशयाच्या खालील भागात नाझरे सुपे हद्दी पासून ते अंबी गावा पर्यंत अवैध वाळू उपशाने वाळवंट होऊन गेले आहे.बातम्या प्रसिद्ध झाल्यावरच प्रशासनाकडून पंचानाम्याचा दिखाऊपणा केला जात आहे.पुन्हा ठराविक कालावधीचा विश्रांती नंतर पुन्हा वाळू उपा जोर धरत आहे.
यामुळे प्रशासन कोणाची पाठराखण व कशासाठी करते असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.पांडेश्वर व जवळार्जुन परिसरात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा झाला आहे.यामुळे नाझरे जलाशयाच्या पासून संपूर्ण कऱ्हा नदीच्या पात्राचा सरसकट पंचनामा करून कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दौंड हवेली तालुक्यातील अवैध वाळू अनेक वर्षापासून रक्तरंजित म्हणून ओळखली जाते.यामध्ये अनेक निष्पाप,गुन्हेगारांना आपला जीव गमवावा लागला आहे.याची पुरंदर प्रशासनाने बोध घेणे गरजेचे असल्याचे बोलले जाते.