मुंबई
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी शिवसेना संपवायला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. शिवतारे यांच्या आरोपानंतर नव्या वादाला सुरुवात झाली आहे. विजय शिवतारेंच्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.डोंबिवलीत एका कार्यक्रमात खडसे उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
या वेळी त्यांनी शिवतारे यांचा प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खरपूस समाचार घेतला. एकनाथ खडसे म्हणाले, ‘शरद पवार हे राज्याच्या राजकारणातील बर्म्युडा ट्रँगल आहे असं म्हणण्यापेक्षा त्यांनी अनेक माणसं मोठी केली. त्यांच्यामुळे उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकले.
शरद पवार यांच्यावर आरोप म्हणजे एक मूर्खपणा आहे’.शरद पवार यांनी एका रात्रीत महाविकास आघाडी निर्माण केली. या रज्यामध्ये सत्ता आणली. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र सरकार आलं आणि ते चाललं. आता सुरू असलेलं राजकारण राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून हे योग्य नाही, असेही एकनाथ खडसे म्हणाले.