हिंगोली
शिंदे गटाचे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. राज्यातील सत्तांतर ते सत्ता स्थापनेनंतर संतोष बांगर विविध कारणांमुळे नेहमी चर्चेत असतात. बांगर यांच्या रागामुळे सातत्याने चर्चेत असतात.आता पुन्हा एकदा ‘अँग्री बांगर’ यांचा महावितरण अधिकाऱ्यांला झापतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. आमदार संतोष बांगर महावितरण अधिकाऱ्याला दम देताना दिसत आहेत.
यापुढे लाईन तोडली तर रट्टे द्यायला लावीन, अशा शब्दात बांगर यांनी एका अधिकाऱ्याला दम दिली.समोर आलेल्या व्हिडीओत आमदार संतोष बांगर त्यांच्या गाडीत बसून लाऊड स्पीकरवर कर्मचाऱ्याशी बोलताना दिसत आहेत. मतदारसंघातील काही गावांतील वीज तोडल्यामुळे यावेळा बांगर यांचा राग अनावर झाला. मग त्यांनी थेट महावितरणच्या कर्मचाऱ्याला फोन लावून झापलं.इकडंची लाईन कुणी तोडली.लाईन तोडायची नाही कळत नाहीत का. दुसरं कुणी असतं तर रट्टे द्यायला लावेल.
तुम्हाला सांगितलं होतं लाईनीला हात लावायचा नाही. असा इशारा बांगर यांनी दिला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.काही दिवसांपूर्वी देखील संतोष बांगर यांनी हिंगोलीतील पीक विमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली होते. पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला होता.
त्याआधी कामगारांना मध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या एका हॉटेलची पाहणी करत असताना अन्नाचा निकृष्ट दर्जा पाहून बांगर संतापले होते.त्यावेळी त्यांनी उपहागृह व्यवस्थापकाच्या कानशिलातच लावली होती.