पुणे
नुकतेच ठाणे येथील कार्यक्रमात योगगुरू रामदेव बाबा यांनी महिलांच्या पेहराव, कपडे , सुंदरता या विषयी अत्यंत अपमानास्पद, अश्लील, लज्जा उत्पन्न होणारे वक्तव्य केले आहे.याविषयी ची क्लिप प्रसार माध्यम व इतर माध्यमातून सर्वत्र फिरत आहे.रामदेव बाबा यांनी केलेले कृत्य हे जाणून बुजून केले आहे.हा विनयभंगाचा गुन्हा आहे.
तरी रामदेव बाबावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याना अटक करण्यात यावी अन्यथा तिन दिवसानंतर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याचा जो काही उद्रेक होईल याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहिल.
अशा स्वरूपाचे निवेदन पुणे जिल्हा ( पश्चिम) च्या जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा सुनिताताई शिंदे व जिजाऊ ब्रिगेड च्या शिष्टमंडळाने पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त मा.अंकुश शिंदे यांना दिले.
आयुक्तांच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सपना देवतळे मॅडम यांनी स्वीकारले यावेळी जिजाऊ ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्षा सुनिताताई शिंदे , संघटक हेमाताई ग्यानी ,पिंपरी चिंचवड शहराध्यक्षा स्मिताताई म्हसकर, रत्नमाला खराडे ,रत्नप्रभा ताई सातपुते यांचेसह जिजाऊ ब्रिगेड च्या पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.