पुरंदर
बोपदेव घाटात अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून तीघांना लुटल्याची धक्कादायक घटना घडली असून रामा थापा राहणार मिठा नगर, कोंढवा खुर्द, पुणे यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून त्यानुसार चार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी रामा थापा हे सिक्युरिटी गार्ड चे काम करत असून चुलत भाऊ अमन थापा (वय १८) व त्याचा मित्र सुरेंद्र थापा यांच्यासह मोटरसायकलवरून ते बोपदेव घाटातून सासवड रस्त्याकडे जात होते.
त्यावेळी दुचाकीवरून चार अनोळखी व्यक्ती आल्या आणि फिर्यादी व त्यांचा भाऊ व त्यांच्या मित्राला चाकूच्या धाक दाखवून तीन मोबाईल व रोख रक्कम एक हजार रुपये असे एकूण ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे याबाबतीत कोंढवा पोलीस पुढील तपास करीत आहेत