पुणे
राज्यभरात विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा ज्वर वाढत असतानाच पुरंदर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रशासकीय इमारत सासवड मध्ये होत आहे. पुरंदर विधानसभा निवडणुकीत यावर्षी विक्रमी ६१.०२ टक्के मतदान झाले होते.
१६ उमेदवार आपले आमदारकीचे नशीब आजमावत असले तरी, महायुतीतून कॉंग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप, महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, महायुतीतूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांच्यातच खरी लढत होताना दिसून आली.
सतराव्या फेरी अखेर विजय शिवतारे 75 हजार 421 संजय जगताप 49 हजार 735, तर संभाजी झेंडे यांना 30 हजार 142 मते पडली आहेत. विजय शिवतारे 25 हजार 686 मतांनी आघाडीवर आहेत.