मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की… “या” बड्या नेत्याचं ट्वीट व्हायरल

मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की… “या” बड्या नेत्याचं ट्वीट व्हायरल

पुणे

महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल, याचा नेम राहिला नाही. अगदी वर्षभरापूर्वी महाविकासआघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड करत थेट गुवाहाटी गाठली.

परिणामी सरकारचं बहुमत कमी झालं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसह हातमिळवणी करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या घटनाक्रमाला एक वर्ष पूर्ण होत असतानाच अजित पवार यांनी सुद्धा राष्ट्रवादीतून बंड करत युती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांना घेऊ अजितदादा शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले.

त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ सुद्धा घेतली. मात्र, तेव्हापासून अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असे अंदाज वर्तवले जात आहे. दरम्यान, अजित पवार यांचा आज म्हणजेच शनिवारी २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक सूचक ट्वीट केलं आहे.

अमोल मिटकरी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून अजित पवारांचा एक व्हिडिओ ट्विट केला. या व्हिडिओला त्यांनी ‘मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच #अजितपर्व’ असे कॅप्शन दिले. अमोल मिटकरी यांनी केलेलं ट्वीट जोरदार व्हायरल होत आहे.

त्यांच्या ट्वीटमुळे महाराष्ट्रातील राजकारणात अजून एक मोठा भूकंप होण्याची शक्यता बळावत आहे.अजित पवारांच्या वाढदिवसादिवशीच महाराष्ट्राचे राजकारण तापवणारे ट्विट अमोल मिटकरींनी केले आहे. आता या ट्विटवर एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *