माळशिरस गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी गणेश यादव यांची सलग तिसर्यांदा निवड

माळशिरस गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी गणेश यादव यांची सलग तिसर्यांदा निवड

पुरंदर

पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील सर्वात मोठी असणारी ग्रामपंचायत म्हणजे माळशिरस ग्रामपंचायत. माळशिरस गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सलग तिसर्यांदा गणेशदादा यादव यांची तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब गद्रे यांची निवड करण्यात आली आहे.

सरपंच महादेव बोरावके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ग्रामसभेत तंटामुक्ती समिती निवडण्यात आली. या सभेत सर्वानुमते गणेश यादव यांना अध्यक्ष व बाळासाहेब गद्रे यांना उपाध्यक्ष म्हणुन सलग तिसर्या वेळी निवडण्यात आले.

पुरंदर तालुक्याचे विद्यमान आमदार संजय जगताप यांचे विश्वासु सहकारी म्हणुन गणेश यादव यांच्याकडे पाहिले जाते त्यांची निवड झाल्याबद्दल पंचायत समिती सदस्या सोनाली यादव तसेच माळशिरस ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *