मा.मंत्री विजय शिवतारे यांचे जावई मराठमोळे “सुपरकॉप” IPS शिवदीप लांडे यांचा राजीनामा; बिहार,महाराष्ट्र नव्हे संपूर्ण देशात चर्चा सुरू

मा.मंत्री विजय शिवतारे यांचे जावई मराठमोळे “सुपरकॉप” IPS शिवदीप लांडे यांचा राजीनामा; बिहार,महाराष्ट्र नव्हे संपूर्ण देशात चर्चा सुरू

पुणे

बिहार पोलीसमधील सुपरकॉप अशी ओळख असलेले IPS शिवदीप वामनराव लांडे यांनी राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानंतर देखील बिहारमध्ये सेवा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिवदीप यांनी त्यांच्या फेसबुकवर राजीनामा दिल्याचे सांगितले. शिवदीप लांडे यांचा समावेश बिहारमधील अशा पोलीस अधिकाऱ्यांमध्ये होतो जे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कोणाच्या दबावापुढे झुकत नाहीत.

त्याची ओळख एक प्रामाणीक आणि चांगले पोलीस अधिकारी अशी आहे. शिवदीप लांडे हे सध्या पूर्णिया रेंजचे आयजी आहेत. लांडे हे काही काळ महाराष्ट्रातही प्रतिनियुक्तीवर होते. पुणे जिल्ह्यातील माजी आमदार विजय शिवतारे यांचे ते जावई आहेत.शिवदीप लांडे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर राजीनामा दिल्याचे जाहीर केले.

ते म्हणतात- मेरे प्रिय बिहार, गेल्या १८ वर्षापासून मी सरकारी पदावर सेवा देत आहे. आज या पदाचा मी राजीनामा देत आहे. इतक्या वर्षात मी बिहारला स्वत:पेक्षा आणि माझ्या कुटुंबापेक्षा सर्वोच्च मानले. एक सरकारी सेवक म्हणून माझ्या कार्यकाळात काही त्रूटी राहिल्या असतील तर त्यासाठी मी माफी मागतो.

मी आज भारतीय पोलिस दलाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानंतर मात्र मी बिहारमध्येच राहणार आहे. यापुढे ही बिहारच माझी कर्मभूमी असेल. जय हिंद!शिवदीप लांडे यांच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर विविध चर्चांना उत आला आहे. संपूर्ण बिहारमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे की, अखेर एका चांगल्या आयपीएस अधिकाऱ्याने वेळेआधीच का राजीनामा दिला.

लांडे यांना काही त्रास होता का? अर्थात लांडे याची ओळख अशी आहे की, ते कामासमोर कोणत्याही गोष्टीचा विचार करत नसत. कायदा सुव्यवस्था राखणे हेच त्यांच्या समोरचे मुख्य लक्ष्य असायचे. लांडे यांची पूर्णिया येथे बदली करण्यात आली होती. याआधी ते पूर्णियाच्या तुलनेत मोठ्या असलेल्या तिरहुत येथे नियुक्तीवर होते.

फेसबुकवर लांडे यांनी शेअर केलेल्या पोस्टवरून ते यापुढे बिहारमध्ये राहणार आहेत हे स्पष्ट आहे. बिहार माझी कर्मभूमी असेल असे त्यांनी म्हटले असल्याने आता ते पुढे काय करणार याची उत्सुकता लागली आहे. लांडे याबाबत कधी घोषणा करतील हे पहावे लागले.


शिवदीप लांडे हे अकोल्याचे असून त्यांनी कोसी विभागाचे उपमहानिरीक्षक, बिहारमधील अररिया, पूर्णिया आणि मुंगेर या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. बिहार पोलिसात असलेल्या सिनिअर अधिकाऱ्यांपैकी गेल्या काही दिवसात राजीनामा देणारे लांडे हे दुसरे अधिकारी ठरले आहेत.

याआधी काही दिवसांपूर्वी लेडी सिंघम अशी ओळख असलेल्या आयपीएस अधिकारी काम्या मिश्रा यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला होता.शिवदीप लांडे यांनी राजीनामा दिल्यानंतर ते राजकारणात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *