संजिवनी गायकवाड
संपादक
संजीवनी न्युज
दिल्लीतील निर्भया घटना, कोपर्डी घटना, मुंबई येथील साकीनाका मधील घटना पुणेतील बलात्कार अंगावर शहरे आणणार्या निंदनीय घटना आहेत. यातून एक गोष्ट लक्षात येते की खरोखर महिला सुरक्षित आहेत का?
घरी असेल तरी आणि घरात असेल तरी महिलांवर अन्याय अत्याचार होतच असतात परंतु इज्जती पोटी त्या गप्प बसतात असे एखादे प्रकरण घडले की नेतेमंडळी फक्त त्या घटनेचा निषेध करतात परंतु अशा नराधमांना थेट फाशीपर्यंत पोहोचविण्यासाठी कुठल्याही कायद्याची अंमलबजावणी करत नाहीत जर कायद्याची कठोर अंमलबजावणी झाली तरच अशा नराधमांना चाप बसेल.
स्त्री जात ही फक्त वासना आणि वासनेने बरबटलेल्या लोकांसाठी उपभोगण्याची वस्तू आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.महिला सक्षमीकरणावर सरकार जोर देत असताना महिलांवर अन्याय अत्याचार हा सर्वच स्तरांमधून सुरू आहे.त्यामुळे महिलांनी कसे वागायचे हा प्रश्न सर्वच महिलां पुढे आ वासून उभा आहे सरकारने लवकरात लवकर कठोर कायदा करून सर्व महिलांना न्याय द्यावा अशी अपेक्षा सर्व महिलांमधून होत आहे