महावितरणचा अजबगजब फतवा!गैरकारभाराने पुरंदर तालुक्यातील शेतकरी हैराण;दिवसपाळीला विद्युत पुरवठा आता होणार दिवसाआड

महावितरणचा अजबगजब फतवा!गैरकारभाराने पुरंदर तालुक्यातील शेतकरी हैराण;दिवसपाळीला विद्युत पुरवठा आता होणार दिवसाआड

वाघापूर दिनांक 2 (वार्ताहर)

पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या दोन महिन्यांपासून महावितरणच्या गैरकारभाराचा कळस झाला आहे. दरम्यान,दिवस पाळीला वीजपुरवठा आठवड्यातून सात दिवस पाहिजे पण आता त्यात अजब गजब फतवा काढून हा दिवस पाळीचा वीजपुरवठा दिवसाआड केल्याने शेतक-यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे.

ज्यांच्या पाळीच्या विहिरी आहेत किंवा ज्या शेतकर्‍यांना एक दिवसाचीच पाळी आहे. या शेतकर्‍यांनी नेमके करायचे काय असा प्रश्न शेतकर्‍यांपुढे सध्या पडलेला दिसत आहे.वास्तविक पाहता सध्या हवामान बदलामुळे बऱ्याचशा विहिरींचे व कुप नलिकेचे पाणी हे ढगाळ वातावरणाने कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

महावितरण ने दिवस पाळीत लाईटचे योग्य नियोजन न केल्याने ज्यांची पाळी एक दिवसाची असेल व त्या विहिरीत समजा सहा जण असतील तर त्या शेतकऱ्याला सातव्या दिवशी पाळी मिळेल व ज्या दिवशी त्या शेतकऱ्याची पाळी येईल त्या दिवशी जर लाईटच नसेल तर त्या शेतकऱ्याला पंधरा दिवस पाण्याशिवाय आपली शेती कशी जपावी हाच खूप मोठा प्रश्न पडलेला आहे.

महावितरणच्या या भोंगळ कारभाराला नेमका कोणाचा धाक असणार हाच प्रश्न सध्या पुरंदर तालुक्यातील शेतकरी विचारीत आहेत.

धोरण वगैरे काही नाही लोड बसत नाही म्हणून केलेली ॲडजस्टमेंट आहे:जिवन ठोंबरे,शाखा अभियंता,राजेवाडी

मलाही बर्‍याच शेतकर्‍याकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शेतकर्‍यांना कोणताही त्रास होणार नाही व या अनुषंगाने मी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांशी दोनच दिवसात मिटींग लावणार आहे : विजय शिवतारे,आमदार पुरंदर-हवेली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *