मुंबई
राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर भाजपचे धनंजय महाडीक यांचा विजय झाला आहे.
पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी , भाजपचे पीयूष गोयल आणि अनिल बोंडे हे विजयी झाले. हा महाविकास आघाडीला मोठा फटका बसल्याचे बोलले जाते. भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी ठरली आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी मतदान झाले. महाविकास आघाडी आणि भाजपने परस्परांच्या आमदारांच्या मत प्रक्रियेवर आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक मतमोजणी लांबली. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मतमोजणीला सुरुवात झाली.
पहिल्या पसंतीक्रमाच्या मतांमध्ये महाविकास आघाडीचे संजय राऊत, प्रफुल्ल पटेल आणि इम्रान प्रतापगढी हे तिन्ही उमेदवार विजयी झाले. तर भाजपचे पीयूष गोयल आणि अनिल बोंडे हे विजयी झाले. तर सहाव्या जागेसाठी धनंजय महाडीक आणि संजय पवार यांच्यात चुरस होती. दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतमोजणीत धनंजय महाडीक यांनी बाजी मारली. तर संजय पवार यांना पराभवाचा धक्का बसला.
मतांची आकडेवारी
संजय राऊत – ४१
प्रफुल्ल पटेल- ४३ -२
प्रतापगढी – ४४ – ३
संजय पवार – ३३
अनिल बोंडे- ४८
पीयूष गोयल – ४८
धनंजय महाडीक – २७
संजय पवार – ३३+२= ३४
संजय पवार यांना ३३ मते मिळाली. त्यात प्रफुल्ल पटेल यांना मिळालेली ४३ मते. त्यातील ४१ चा कोटा पूर्ण करत उरलेली २ तर, प्रतापगढी यांना मिळालेली ४४ मते. त्यातील ४१ चा कोटा पाहता ३ मते शिल्लक राहतात.संजय पवार यांना ३८ मते मिळाली.
धनंजय महाडिक २७+७+७= ४१
धनंजय महाडीक यांना २७ तर, पीयूष गोयल यांना ४८ मते मिळाली. त्यातील ४१ चा कोटा पूर्ण करत ७ अधिक मते. तर अनिल बोंडे यांनाही ४८ मते मिळाली. त्यातील ४१ चा कोटा पूर्ण करत, ७ अधिक मते मिळाली. पीयूष गोयल आणि अनिल बोंडे यांची १४ मते अशी धनंजय महाडीक यांना ४१ मते मिळाली. यामध्ये महाडीक यांचा विजय झाला.