मुंबई
वेदांता प्रकल्पापाठोपाठ अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेले असल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या हलगर्जीपणामुळेच हे प्रकल्प राज्याबाहेर गेले असल्याची टीका विरोधक करीत आहे.
तर, तत्कालीन ‘मविआ’सरकारच्या काळातच राज्याबाहेर गेल्याचा दावा करत आहेत.अशातच, माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष गावंडे यांनी खळबळजनक दावा केला आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केलेल्या दिरंगाईमुळेच हा प्रकल्प राज्याबाहेर गेला असल्याचं संतोष गावंडे यांनी म्हटलं आहे.
त्यांच्या या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे.वेदांता प्रकल्प राज्यात राहावा यासाठी महाविकास आघाडी सरकारने प्रयत्न केले नाहीत. शिंदे-फडणवीस सरकार राज्यात आल्यानंतर वेदांता प्रकल्पासाठी बैठक झाली.
महाविकास आघाडी सरकारच्या दिरंगाईमुळे, उदासिनतेमुळेच वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेला, अशी माहिती MIDC कडून देण्यात आली आहे.वेदांतापाठोपाठ तीन मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्पांना आवश्यक गोष्टी पुरवण्यात आल्या नाहीत.
त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केली नाही म्हणून प्रकल्प राज्याबाहेर गेले. असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.मी विरोधी पक्षनेता असतानादेखील या प्रकल्पांसाठी आग्रही होतो. आपल्याकडे प्रकल्प यायला हवेत, यासाठी प्रयत्न केले. प्रसंगी बैठका घेतल्या. पण महाविकास आघाडीला ते टिकवता आलं नाही. आता प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर आमच्यावर आरोप केले जात आहेत, हे योग्य नाही’, असं देखील फडणवीसांचा स्पष्ट केलं आहे.