मुंबई
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मनसेचा महत्त्वाचा मेळावा पार पडत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे स्वत: कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.मात्र एकीकडे पक्ष मजबुतीच्या दिशेने पावलं उचलली जात असताना पक्षातील नेत्यांची नाराजी राज ठाकरेंसाठी डोकेदुखी ठरु शकते.
कारण वसंत मोरे यांच्यनंतर आता मुंबईतील मनसेचा एक नेता नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.पुण्यानंतर मुंबईतही मनसेचा नेता नाराज असल्याचं समोर येत आहे. माहीम विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार नाराज असल्याची चर्चा आहे.
मनसेच्या मेळाव्याला यशवंत किल्लेदार यांनी दांडी मारल्याने एकच चर्चा सुरु झाली आहे.पुण्यात वसंत मोरे यांच्या नाराजीनंतर मुंबईत यशवंत किल्लेदारांची नाराजी पक्षाला परवडणारी नाही पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे यशवंत किल्लेदार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.
मी नाराज नाही, तर माझे कार्यकर्ते नाराज आहेत. मेळाव्याला मला बोलवलं मात्र बोलू दिलं नाही. त्यामुळे कार्यक्रम संपल्यानंतर कार्यकर्ते मला विचारत होते, तुम्ही का बोलले नाही. मी त्यांना सांगितलं मला माहिती नाही वरिष्ठांना विचारा. तात्या आम्ही तुम्हाला ऐकायला आलो होतो, असं कार्यकर्ते म्हणत होते. हीच परिस्थिती माझ्या मतदारसंघातील मेळाव्यात झाली होती. त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांना उत्तरं द्यावीत असं का होतं, असं वसंत मोरे यांनी सांगितलं.