उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याचे सत्र सुरु आहेच. ऐन दिवाळीत आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. मात्र, या शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना आणखी एका धक्कादायक आणि हतबल करणाऱ्या समस्येचा सामना करावा लागला.
या शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांकडून 1500 रुपये घेतले. पैशांची जुळवाजुळव करुन कुटुंबियांनी पैसे दिले. यानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला.कारी येथील लक्ष्मण वाघे या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या कुटुंबाने पैसे नसल्याने दिवाळी साजरी केली नाही.
याच नैराश्यातून वाघे यांनी आपले जीवन संपवले.लक्ष्मण यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या मृत देहाचे शव विच्छेदन करण्यासाठी पांगरी प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणारा खासगी व्यक्ती बगाडे याने 2500 रुपयांची मागणी केली.
मात्र, पैसे नसल्याने लक्ष्मण यांच्या कुटुंबियांनी सांगीतले. अखेरीस या व्यक्तीने 1500 रुपये फोन पे वर स्वीकारले.पैसे मिळाल्यानंतर मृतदेह ताब्यात दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मढ्याच्या टाळुवर लोणी खाने हे नेमके काय याचा प्रत्यय इथे आला आहे.