भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पुरंदर तालुका अध्यक्षपदी विठ्ठल जगताप

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पुरंदर तालुका अध्यक्षपदी विठ्ठल जगताप

पुरंदर

पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील आंबळे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य व पुरंदर तालुक्यातील नामांकित उद्योजक विठ्ठल जगताप यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुरंदर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते नुकतेच देण्यात आले.

पक्ष विस्ताराच्या दृष्टिने ही खुप मोठी जबाबदारी असुन भारतीय जनता पक्ष व पक्षाचे विचार तळागाळातील सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचविण्याचे काम करुन सर्व तरुणांना एकत्रीत करुन संघटना व पक्ष पुरंदर तालुक्यात मजबुत करण्याचे काम करणार असल्याचे नवनियुक्त अध्यक्ष विठ्ठल जगताप यांनी सांगीतले.

या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश तात्या भेगडे,माजी राज्यमंत्री संजय(बाळा)भेगडे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल दादा शेवाळे,बाबाराजे जाधवराव, तालुकाध्यक्ष गंगाराम दादा जगदाळे आदि उपस्थित होते.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *