पुणे
शिंदवणे घाट परिसरात एका 40 ते 45 वर्ष वयोगट असलेल्या एका अज्ञात व्यक्तीचा गळफास घेतल्याचा मृतदेह आढळून आला आहे. सोमवारी (ता. 18) सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.
उरुळी कांचन पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सदर घटनेची माहिती घेत आहेत. तसेच आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकले नाही.
सदर व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे आव्हान उरुळी कांचन पोलिसांसमोर उभे राहिले असून त्यानुसार पुढील तपास सुरु केला आहे.
मृत इसमाचे वय अंदाजे 40 ते 45 वर्षे, चेहरा गोल, रंग गोरा, उंची साडेपाच ते 6 फुट, डोक्याचे केस काळे वाढलेले, दाढी काळी पंढरी वाढलेली, अंगात केशरी रंगाचा शर्ट आहे.
वेदांत रुग्णवाहिकेचे अमोल झोंबाडे यांच्या रुग्णवाहिकेच्या माध्यामातून उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुढील कार्यवाही सुरु आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी उरुळी कांचन पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.