पुरंदर
पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे झिका विषाणू बाधित एक रुग्ण आढळून आल्यानंतर आता प्रशासनाच्या वतीने या विषयाला प्रतिबंध करण्यासाठी विविध उपाय योजनांना सुरुवात करण्यात आली.
यामध्ये गावात मच्छर प्रतिबंधक उपाय योजना राबविण्यात येत आहेत गावामध्ये सर्वे करून ताप सदृष्य आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत का ते पाहण्यात येत आहे त्याचबरोबर गावामध्ये लोकांकडे असलेल्या साठवण टाकतील पाण्याची पाहणी आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे ज्या ठिकाणी जास्त पाणी साठवले जाते अशा ठिकाणी आरोग्य विभागाकडून गप्पी मासे सोडण्यात येत आहेत.
आज एक ऑगस्ट रोजी तालुका वैद्यकीय अधिकारी उज्वला जाधव या स्वतः बेलसर मध्ये येऊन या सर्व गोष्टींची खातरजमा केली आहे.या उपाय योनानावर त्या लक्ष ठेऊन आहेत.
लोकांमध्ये या विषाणू बाबत माहिती व्हावी म्हणून ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून या विषयाची माहिती दिली जात आहे ग्रामपंचायत प्रशासन सुद्धा आरोग्य विभागाला मदत करत असून पुढील काळात या आजाराचे रुग्ण वाढणार नाहीत याबाबत काळजी घेत असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले आहे.