प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सायकलिंग करा हडपसर अथेलेटिक क्लब कडून आवाहन

प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सायकलिंग करा हडपसर अथेलेटिक क्लब कडून आवाहन

पुरंदर

कोरोना काळामध्ये आपण एक गोष्ट शिकलो, ती म्हणजे आपली प्रतिकार शक्ति उत्तम ठेवणे,प्रतिकार शक्ति कमी असेल तर तुमच्याकडची अमाप संपत्ती ही तुम्हाला आजारा पासून वाचवू शकत नाही हे आपण अलीकडील काही उदाहरणातून पाहिले आहे.

त्यासाठी योग्य आहार अणि नियमित व्यायाम करणे फार गरजेचे आहे. सायकलिंग हा एक उत्तम व्यायाम प्रकार आहे कारण आपल्या रोजच्या दिनचर्येत थोडा तरी का होईना प्रवास आपल्याला करावाच लागतो, त्यासही महागडे इंधनासाठी पैसा खर्च करावा लागतो शिवाय आपण नकळत प्रदूषण ही वाढवतो. ह्या गोष्टी आपण सायकल वापरुन टाळू शकतो त्याच बरोबर आपले आरोग्य ही उत्तम राहते. तुम्ही सायकलिंग करता त्यावेळी तुमची गती ही मर्यादित असते त्यामुळे तुम्ही स्वभवतालच्या निसर्गाचा आनंद घेऊ शकता.

हडपसर अथेलेटिक क्लब या ग्रुप मध्ये सर्व क्षेत्रातील लोक आहेत, नोकरदार, व्यावसायिक, शेतकरी, नोकरदार,वयस्कर, अगदी ८वी ९वी तील मुले ही आहेत हडपसर अथेलेटिक क्लब ग्रुपचे एक उद्दिष्ट असे की सायकलला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे. आज आपण गावात एखाद्याने वाहन घेतल्यावर जी ऐट वाढते, ते सायकल घेतल्या नंतर झाले पाहिजे त्यावेळी समाजाची मानसिकता बदलेल. त्यासाठी समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींने थोडे का होईना सायकल वरुण फिरले पाहिजे. असे हडपसर अथेलेटिक क्लब मध्ये सहभागी सायकलिस्ट – संतोष मोहिते, पृथ्वीराज शिंदे, आप्पा थोरात, विजय गायकवाड, प्रशांत घुले, संग्राम पाटील, सुदर्शन क्षिरसागर, सागर तुपे, अजित झेंडे, सुनील डांगमाळी, साई ढवळे, हे पुण्याहून यवत मार्गे भुलेश्वर वरून राजेवाडी येथे आले होते त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली.

सर्वांचे स्वागत ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शिंदे सुवर्णा शिंदे संभाजीराव कोकाटे यांच्यासह ग्रामस्थांनी केले
आत्तापर्यंत हडपसर अथेलेटिक क्लब ग्रूपमधील सभासदांनी पंढरपूर, कोल्हापूर, आकरा मारुती, महाबळेश्वर, मुंबई, अष्टविनायक, लोणावळा पुण्यालगतचे किल्ले असा पंधरा ते वीस हजार किलोमीटर प्रवास केला असून आठवडाभरात अडीचशे ते तीनशे किलोमीटर प्रवास करीत आहेत सायकलिंग सरू करून निरोगी आरोग्य जगण्याचा आदर्श तरुणांनी घेणे गरजेचे आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *