पोलिस दलात खळबळ !!!!              विनयभंगाचा गुन्हा रद्द करण्यासाठी मागीतली पन्नास हजारांची लाच ; पोलीस उपनिरीक्षकांसह काँन्स्टेबलला रंगेहाथ पकडले

पोलिस दलात खळबळ !!!! विनयभंगाचा गुन्हा रद्द करण्यासाठी मागीतली पन्नास हजारांची लाच ; पोलीस उपनिरीक्षकांसह काँन्स्टेबलला रंगेहाथ पकडले

बीड

गेल्या काही दिवसांपासून राज्यात लाचखोर सरकारी कर्मचाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आता या अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात केली आहे.

अशातच बीडमध्ये लाचलुचपत विभागाने एक मोठी कारवाई केली आहे. विनयभंगाचा गुन्हा बी फायनल करण्यासाठी १० हजारांची लाच घेताना एका पोलिस उपनिरीक्षकासह पोलीस कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.पोलीस उपनिरीक्षक राजु गायकवाड व पोलीस कर्मचारी विकास यमगर अशी लाचखोरांची नावे आहेत. दोघेही बीड येथील शिवाजीनगर ठाण्यात कार्यरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुध्द बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात १७ ऑक्टोबर रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल होता.

या गुन्ह्यात मदत करण्यासाठी उपनिरीक्षक गायकवाड व अंमलदार यमगर यांनी तक्रारदाराकडे ५० हजारांची मागणी केली होती. दरम्यान, तडजोडीअंती १० हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, तक्रादाराची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने ही माहिती लाचलुचपत विभागाला दिली.

पोलिसांनी सापळा रचत शहरातील बसस्थानकासमोरील उडपी हॉटेलात पैसे स्विकारताना दोघांनाही रंगेहाथ अटक केली. दरम्यान या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद येथील एसीबीच्या पथकाने ही कारवाई केलीय. तर या कारवाईने बीड जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *