पुरावे न दिल्यास रवी राणा यांना बांगड्या घालून गाढवावरून त्यांची धिंड काढणार

पुरावे न दिल्यास रवी राणा यांना बांगड्या घालून गाढवावरून त्यांची धिंड काढणार

पुरंदर

आमदार बच्चुभाऊ कडू यांच्यावर खोटे आरोप करून बदनामी करत असल्याबद्दल बेताल वक्तव्य करणा-या आमदार रवी राणा यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा पुरावे दयावे,जाहीर माफी मागावीअशी मागणी पुणे जिल्हा प्रहार संघटनेच्या वतीने पोलीस अधीक्षक मितेश घठ्ठे पुणे ग्रामीण यांना लेखी निवेदन देऊन करण्यात आली.

यावेळेस धर्मेंद्र सातव,सुरेखाताई ढवळे पुणे जिल्हा अध्यक्ष,शरद जाधव,महिला जिल्हाध्यक्ष अनिताताई कदम,प्रहार जनशक्ती पक्षाच्या पुणे शहराध्यक्ष मीनाताई धोत्रे,सुभाष अण्णा दिवेकर,शरद दिवेकर,संभाजी नवले,मनोज शितोळे,वंदना शिरतोडे,अनिल फरगडे होते.

एक नोव्हेंबर पर्यंत रवी राणा यांनी केलेल्या बेताल वक्तव्याबद्दल पुरावे न दिल्यास महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल व रवी राणा यांना बांगड्या घालून गाढवावरून त्यांची दिंड काढण्यात येईल अशी मागणी प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *