पुरंदर
पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील आंबळे या गावातील तरुणांनी राजकारण व राजकीय पक्षाला रामराम ठोकत आंबळे ग्रामविकास प्रतिष्ठानची स्थापना करण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे.
राजकारणात तरुणांना निरनिराळ्या पक्षाची पदे देऊन पक्षाकडे वळवले जाते परंतु उमेदीच्या काळातच तरुणांना या सर्व गोष्टींमुळे उद्योग व्यावसायापासुन लांब जावे लागत असल्याची भावना तरुणांनी व्यक्त केली.
तसेच या पदांचा वापर हा फक्त पक्षाची वाढ करण्यासाठी करुन घेतात, परंतु त्या पदाधिकार्याला घरदार सोडुन यांच्याच मागे फिरावे लागत असल्याचीही भावना व्यक्त होताना दिसते.
पक्षाचा शिक्का कपाळी असल्याने ग्रामविकासात खिळ पडत असल्यानेच पक्षविरहित अशा आंबळे ग्रामविकास प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली असल्याचे तरुण पदाधिकार्यांनी सांगितले.
यावेळी सुमित जगताप,संतोष शेंबडे,आकाश जगताप,भूषण जगताप,संदेश दरेकर,अक्षय शेंडगे,संकेत काळे तसेच बहुसंख्य तरुण उपस्थित होते.