पुरंदर
पुरंदर तालुक्यात वडिलोपार्जित शेतजमिनीवर वारस नोंद करण्यासाठी मंडल अधिकाऱ्यांनी प्रशासकीय कामकाजासाठी वकिलांनाच वीस हजाराची लाच मागितल्याचे समोर आले आहे.
प्रशासकीय अधिकारी प्रशासकीय कामकाजासाठी प्रशासकीय कामकाजाची माहिती असलेल्या वकिलांकडूनच लाच घेत असतील तर सर्वसामान्य नागरिकांना असे लाचखोर अधिकारी धुवून खत असतील.यामुळे अशा लाचखोर अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी एडवोकेट किरण साळुंके यांनी केली आहे.
अन्यथा ढोल बजाओ, बोंब मारो आंदोलनाचा इशारा साळुंखे यांनी दिला आहे. अधिक माहिती नुसार शिवरी(तालुका पुरंदर)येथील लक्ष्मण कृष्ण साळुंखे यांनी वडिलोपार्जित शेतजमिनीवर वारस नोंद करण्यासाठी ४ मार्च रोजी अर्ज केला होता. एडवोकेट किरण साळुंखे हे यापैकी काही क्षेत्राचे वारसदार असल्याने ते या कामाचा पाठपुरावा करत होते.
मात्र अनेक दिवस उलटूनही वारस नोंद न झाल्याने तलाठ्यांना साळुंके भेटलो असता तुमची नोंद धरली आहे.याकामी मंडल अधिकाऱ्यांना भेटा असे तलाठ्यांनी साळुंके यांना सांगितले.मंडल अधिकाऱ्यांना भेटलो असता तलाठ्यांनी जुनी वारस नोंद झाल्याचे फेरफार जोडले नाहीत.तलाठ्यांना भेटून फेरफार अपलोड करण्यास सांगावे असे मंडल अधिकारी प्रभादेवी गोरे यांनी सांगितले.
त्याप्रमाणे तलाठ्यांनी फेरफार नोंद अपलोड केली.तदनंतर मंडल अधिकारी कोरे यांनी एडवोकेट किरण साळुंके यांना बोलावून घेतले. व वरील फेरफार मध्ये चुका काढून नोंद धरता येणार नाही असे सांगितले.तदनंतर मंडल अधिकारी प्रभावती कोरे यांनी ६ मे रोजी कॉल करून दिवाणी न्यायालयाच्या लगत असलेल्या एका हॉटेल मध्ये बोलवून सदर वारस नोंद करण्यासाठी वीस हजार रुपयाची लाच मागितली.या लाच खोरीचा सबळ पुरावा माझ्या कडे आहे.संबंधित मंडल अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी किरण साळुंके यांनी केली आहे.
तसेच माझ्या वडिलोपार्जित वारस नोंदी बरोबर तालुक्यातील ज्या ज्या नागरिकांनी हक्कसोड,वारस नोंद व इतर प्रलंबित नोंदीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रांची पूर्तता केली आहे. व त्या नोंदी अद्याप झालेल्या नाहीत अशा सर्व नागरिकांच्या नोंदी पाच दिवसात न झाल्यास तहसीलदार कार्यालयासमोर लाचखोर कर्तव्य शून्य अधिकाऱ्यांविरोधात संविधनिक मार्गाने ढोल बजाव बोंब मारो आंदोलन करणार असल्याचे वकील किरण साळुंके यांनी सांगितले.
निवेदन देताना ऍड गौरीताई कुंजीर, ऍड गौरव साळुंके,ऍड विशाल कामथे,ऍड संतोष कचरे,ऍड किरण साळुंके,ऍड गणेश ऊरने,अनिकेत भगत,संतोष कोलते सामाजिक कार्यकर्ते शैलेश रोमन आदी उपस्थित होते.
याबाबत मंडल अधिकारी प्रभावती कोरे यांच्याशी संपर्क साधला असता फोन उचलला नाही.टेक्स मेसेज करा असे सांगितले.टेक्स मेसेज केला तरी रिप्लाय दिला नाही.नंतर फोन उचलला असता आवाज येत नाही असे सांगून फोन कट केला.