पुरंदर
पुरंदर तालुक्यातील आंबळे गावचे सुपुत्र प्रविण बाळासाहेब जगताप यांना सिक्युरिटी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सिने अभिनेत्री व बिझनेस वुमन तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते नाशिक मधील झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र बिजनेस अवॉर्ड २०२२ ने सन्मानीत करण्यात आले.
मुळचे आंबळे गावचे रहिवाशी असणारे प्रविण जगताप हे सध्या बारामतीमध्ये वास्तव्यास आहेत. मराठा इंटेलिजन्स सिक्युरिटी सर्व्हिसेस या नावाने त्यांचा व्यावसाय सुरु असुन संपुर्ण महाराष्ट्र भर त्यांच्या व्यावसायाची व्याप्ती आहे.
प्रविण जगताप हे सुरक्षारक्षक तसेच बांऊसर तसेच सिक्योरिटी संदर्भातील सर्व प्रकारच्या सेवा कंपनीमध्ये व मोठमोठ्या मॉलमध्ये तसेच बँक एटीएम या सर्व ठिकाणी पुरवतात.
गेली बारा वर्षापासून ते या क्षेत्रामध्ये काम करत आहेत.आता त्यांच्याकडे खुप मोठ्या प्रमाणात लोक काम करत आहेत. त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल आंबळे व पुरंदर तालुक्यातुन तसेच बारामतीतुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.