पुरंदर
पुरंदर तालुक्यात सध्या बर्याच रस्त्यांवर चिखलाचे व खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असताना त्यात आणखी भर पडली आहे ती सासवड-यवत रस्त्यावर राजेवाडी याठिकाणी सुरु असलेल्या पुलाच्या शेजारच्या पर्यायी रस्त्याची.
सासवड-यवत या रस्त्यावर राजेवाडी या ठिकाणी असणार्या पुलाचे काम मागील सहा महिन्यापासुन चालु आहे. वाहतुक सुरु ठेवण्यासाठी याठिकाणी पर्यायी रस्ता करण्यात आला आहे.
सध्या पावसाळा सुरु असल्याने थोडा जरी पाऊस आला तरी या रस्त्यावर असणार्या मातीचा चिखल होतो व दोनचाकी वाहने घसरण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत.
दोन चाकी गाडीच्या शेजारुन जर एखादी चारचाकी गाडी गेली तर चारचाकी गाडीच्या चाकातुन निघणारा चिखल हा पुर्णपणे दोनचाकी गाडीवाल्याच्या अंगावर उडत आहे.
या चिखलात बर्याचशा गाड्या घसरुन त्या गाडीवाल्यांनी चिखलात आंघोळ केलेलीही बर्याच प्रवाशांनी पाहिलेली आहे.
या पुलाचे काम सध्या सुरु असताना या पुलाखाली असणार्या कॉंक्रिटलाही मोठा खड्डा पडल्याचे पहावयास मिळत आहे.
एवढे सगळे प्रकार घडत असताना प्रशासन मात्र मुग गिळुन गप्प बसले आहे की काय? व या पर्यायी रस्त्याची दुरुस्ती कधी करणार? का एखादा मोठा अपघात झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार? असा सवाल सध्या या रस्त्याने प्रवास करणारे प्रवाशी विचारत आहेत.