पुरंदर
पुरंदर तालुक्यात गेल्या वर्ष भरापासून तालुक्यात अनेकांवर अन्याय होत आहे. सर्व सामान्य लोकांचे म्हणणे प्रशासन यंत्रणा ऐकूणच घेत नाही. त्यामुळे अन्याय झालेल्या लोकांच्या पाठीशी पुरंदर भाजप असणार आहे. सासवड पोलीसांच्या विरोधात आमच्या अनेक तक्रारी आहेत. तेव्हा लोकांनी भाजपाच्या नेत्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन असे भारतीय जनता पक्षाचे पुरंदर तालुका अध्यक्ष गंगाराम जगदाळे यांनी सांगितले.
सासवड ( ता. पुरंदर ) येथील पुरंदर भाजपच्या वतीने भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जगदाळे बोलत होते.
यावेळी जगदाळे पुढे म्हणाले, पुरंदर तालुक्यातील पोलीस यांत्रेवर सत्तधारी पक्षाच्या लोकांचा प्रचंड दबाव आहे. आणि त्यातून सर्वसामान्यांच्या तक्रारी पोलीस एकूण घेत नाहीत. ज्या लोकांवर अन्याय झाला आहे. त्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभ केला जात आहे . त्यामुळे आता भारतीय जनता पार्टी सामन्यांच्या पाठीमागे उभी राहणार आहे.
कॉंग्रेसचा एक कार्यकर्ता गृहमंत्री म्हणून पोलीस स्टेशनला वावरत आहे. सतत तालुक्यातील पोलीस स्टेशनाच्या कारभारात ढवळा ढवळ करीत आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांच्या मुलीबाळी आता सुरक्षित राहिल्या नाहीत. नुकताच सासवड मध्ये पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सासवड मध्ये असलेल्या महाविद्यालयातील तरुणी आता सुरक्षित नाहीत. त्यासाठी पोलिसांनी दामिनी पथक कार्यान्वित करावे अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. या सर्वांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी करणार आहोत.
यावेळी भाजपचे पुणे जिल्हा अध्यक्ष गिरीश जगताप, सासवड शहराध्यक्ष साकेत जगताप, युवक नेते जालिंदर जगताप उपस्थित होते.