पुरंदरची पंचायत समिती ऑनड्यूटी आखाडापार्टीवर..

पुरंदरची पंचायत समिती ऑनड्यूटी आखाडापार्टीवर..

पुरंदर

संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आषाढ महिन्यात आखाड पार्टी जोरात असते.राजकारणी मंडळी पासून ते सरकारी बाबू,उद्योगपती या सर्वानाच या पार्टीचे आकर्षण असते. या पार्टीत मटन आणि दारूचा महापूर असतो.याला सरकारी बाबूही अपवाद नाहीत.सध्या असाच एक प्रकार पुरंदर तालुक्यातील पंचायत समितीमध्ये झाला आहे.

पुरंदर पंचायत समितीच्या ग्रामसेवक संघटनेने ऑनड्यूटी टेकवडी या गावांमध्ये शुक्रवार दिनांक२२/७/२०२२ रोजी आखाड पार्टीचा कार्यक्रम आयोजित केला होता…सकाळपासून या जंगी कार्यक्रमाची तयारी चालू होती.बहुतेक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक गेलेच नाहीत.दुपारी एक ते चार अशी पार्टी आयोजित करण्यात आली होती.ग्रामसेवक त्यांच्या भागामध्ये गावात नव्हतेच.त्यात भर म्हणजे पुरंदर पंचायत समिती कार्यालयामधील बहुतांश अधिकारी, विभागप्रमुख आणि कर्मचारी ही ऑनड्युटी या आखाडा पार्टीत सामील झाले होते.

विशेष म्हणजे गटविकास अधिकारी अमर माने हे रजेवर असताना त्यांच्या पश्चात पंचायत समितीचे जबाबदार अधिकारी म्हणून सहाययक गटविकास अधिकारी असतात. पुरंदर पंचायत समितीमध्ये श्री.लहामटे हे आहेत.पण हेच महाशय सर्वात आधी पार्टीत सहभागी होते.त्यांच्याबरोबर लेखाधिकारी अधिकारी, विस्तार अधिकारी ,कर्मचारी हे सगळेच ऑनड्यूटी आखाडा पार्टीचा काय झाडी,काय डोगार,काय मटाण,काय बाटली..सगळं कसं ओके ओके म्हणत आखाडा पार्टीचा आनंद लुटत होते.

गटविकास अधिकारी अमर माने यांनी दूरध्वनी वरून संपर्क साधला असता त्यांनी मी आजारी असल्याने मी रजेवर आहे असे सांगितले.

सहायक बी.डी.ओ.लहामटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.विस्तार अधिकारी यांचा तर कहर च झाला ते भागामध्ये फिरतीवर गेले अस रजिस्टर ला नोंद करून पार्टीचा आनंद लुटत होते.सार्वजनिक बांधकाम विभाग ही याला अपवाद नव्हता.अधिकारी वर्गापासून ते कर्मचारी सर्वचजण या आखाडा पार्टीत सहभागी होऊन आंनद लुटत होते.आपण कामावर आहोत.आपल्याला सुट्टी नाही.तरीसुद्धा हे लोक बिनधास्त वागतात कसे?यांना अभय कोणाचे आहे?

गटविकास अधिकारी प्रशासकीय अधिकारी म्हणून वचक राहिलेला दिसून येत नाही.सध्या पुरंदर पंचायत समितीची अवस्था आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय अशी आहे.कोणाचा कोणाच्यात मेळ नाही.ऑनड्यूटी आखाडा पार्टी करणाऱ्या ग्रामसेवक व त्यामध्ये सहभागी होणाऱ्या सहाययक बी.डी.ओ.,विस्तार अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारीव कर्मचारी यांच्या जिल्हा परिषदेचे सी.ओ काय कारवाई करतात याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *