पुरंदर हादरला!!!!!!तालुक्यातील “या” गावात एकाला कोयत्याने मारहाण,नग्न करून व्हीडीओ काढत दिली जीवे मारण्याची धमकी;४ जणांवर गुन्हा दाखल

पुरंदर हादरला!!!!!!तालुक्यातील “या” गावात एकाला कोयत्याने मारहाण,नग्न करून व्हीडीओ काढत दिली जीवे मारण्याची धमकी;४ जणांवर गुन्हा दाखल

पुणे

मारहान का करता या कारणाने एकाला नग्न करून त्याचा व्हिडीओ काढुन लाकडी दांडक्याने, कोयत्याने डोक्यात मारहाण केल्याची घटना रविवार (दि.१७) घडली आहे. याप्रकरणी सुनिल रामचंद्र खेडेकर, रामचंद्र यशवंत खेडेकर, आनंद रामचंद्र खेडेकर, गौरव भाउसो खेडेकर सर्व (रा.गुरोळी ता.पुरंदर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत दिपक रामचंद्र खेडेकर (रा.गुरोळी ता.पुरंदर) यांनी फिर्याद दिली.

सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रविवार (दि.१७) रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास मी मंगेश रमेश खेडेकर यांच्या गोठयावर बैलास चारा टाकण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी सुनिल रामचंद्र खेडेकर याचा मला फोन आला विराज गणेश कोलते यास घेण्यासाठी आमच्या पोल्ट्रीवर ये म्हणाला त्यामुळे मी पोल्ट्रीवर गेलो.

त्याठिकाणी सुनिल खेडेकर ,रामचंद्र खेडेकर व आनंद खेडेकर हे विराज कोलते व मयंक कोलते यांना मारहाण करीत होते. त्यांनी का मारता असे विचारलले. शुटींग काढण्यासाठी माझा मोबाईल काढला. त्यावेळी गौरव खेडेकर याने माझा मोबाईल हिसकावुन खाली फेकुन दिला व मला शिवीगाळ केली. त्यावेळी सुनिल खेडेकर, रामचंद्र खेडेकर, आनंद खेडेकर व गौरव खेडेकर यांनी आमचा व्हीडीओ काढतो का असे म्हणुन मला हाताने व लाथाबुक्कयांनी मारण्यास सुरवात केली. त्यानंतर मला पोल्ट्रीमध्ये घेवुन गेले.

आनंद खेडेकर याने तेथे पडलेले कॅरेट डोक्यात मारले तसेच रामचंद्र खेडेकर यांनी मला डोक्यात, हातावर व मांडीवर काठीने मारहान केली त्यामुळे तेथुन पळत असताना सुनिल खेडेकर याने तेथील कोयता डोक्यात मारला त्यामुळे डोक्यातुन खुप रक्त येवु लागले. त्याने माझ्या मानेला कोयता लावला व कपडे काढ असे म्हणुन माझी पॅन्ट व अंडरविडर काढुन मला नग्न केले. त्याचा व्हीडीओ काढला व तु कोणास काय सांगीतले तर हा व्हीडीओ व्हायरल करू अशी धमकी देवुन मला पोल्टीमध्ये कोंडले.

संतोष खेडेकर व मंगेश खेडेकर यांनी चारचाकी गाडीत सासवड पोलीस स्टेशन येथे घेवुन आले. पोलीसांनी मला मेडीकल यादी दिली व मी ग्रामीण रूग्णालय डॉक्टरांनी माझ्यावर औषधोपचार केले. त्यानंतर मी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *