पुरंदर
पुरंदर तालुक्यात मागच्या काही दिवसात लाईट बिल वसुलीसाठी महावितरण ने वीज कनेक्शन कट करण्याचा तगादा लावला होता.बहुतांशी शेतकऱ्यांनी लाईट बिल भरल्यामुळे त्यांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
परंतु बऱ्याच ठिकाणी अजूनही ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती व डीपीतील फ्युज बसवण्याची तसदी अजुनही महावितरण घेतली नाही. गेल्या आठ ते दहा दिवसात शेतकऱ्यांनी उभी पिके जळताना स्वत: च्या डोळ्यांनी पाहिली. आता लाईट पूर्ववत केली परंतु डीपीतील फ्युज बसवणार कधी असा प्रश्न सध्या शेतकरी विचारात आहेत.
बिल थकली या नावाखाली लाईट बिल वसुलीसाठी लाईट कट केली पण आता शेतकऱ्यांना महावितरण कडून मिळणाऱ्या सोयी कधी देणार ? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.