पुरंदर
यातील फिर्यादी हे कुट्टी मशीन आणणेकामी सासवड येथे आले होते त्यावेळी सासवड बाजुकडुन जेजुरी बाजुकडे एका पिकअप गाडीत जनावरे भरुन कत्तलीसाठी नेत असल्याचा संशय आला.पिकअप गाडीचा पाठलाग करुन पिकअप गाडीचा नंबर एम.12 जे एफ6920घेवुन गोरक्ष सुहास लिंभोरे याला फोनवरुन माहीती दिली.
त्याने ती पिक अप गाडी खळद गावचे हद्दीत यमाई मंदिराच्या अलिकडे थांबविली.त्याने गाडीची पाहणी केली असता गाडीचे मागील हौद्यामध्ये क्रुरतेने व दाटीवाटीने गोवंश जातीचे म्हैस बांधुन ठेवलेली दिसली.थोड्या वेळात मी सुद्धा तेथे जावुन पाहणी केली असता गाडीच्या हौद्यामध्ये क्रुरतेने व दाटीवाटीने गोवंश जातीचे म्हैस बांधुन ठेवलेले दिसले.ड्राइव्हरकडे विचारणा केली असता त्याने त्याचे नाव ऋषीकेश भोसले रा. कोडीत खुर्द ता. पुरंदर जि. पुणे असे असल्याचे सांगितले.
त्याला ही जनावरे कोठे घेवुन चालला आहे असे विचारता त्याने सदरच्या गोवंश जातीच्या तीन म्हैस कत्तलीसाठी फलटण येथील कत्तलखान्यात नेत असल्याबाबत सांगितले.दरम्यानच्या कालावधीत मी झालेल्या घटनेबाबत पोलीस स्टेशनला फोन करुन माहीती दिली.
मी ड्राईव्हरला विनंती केली.तु पोलीस स्टेशनला चल त्यावेळी त्याने मला शिवीगाळ करुन तु सासवड मध्ये कसे फिरतो तुला बघतो तुला गायबच करतो असे म्हणुन जिवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर थोड्या वेळातच पोलीस आले व सदरची गाडी तीन गोवंश जातीच्या म्हशींसह पोलीस स्टेशनला येवुन तक्रार दिली.
सदरची फिर्याद कुंदन मारुती झेंडे यांनी दिली असुन पुढील तपास पोलिस निरिक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा.लडकत करीत आहेत.