पुरंदर तालुक्यातील शासकीय कार्यालयातच कोरोना नियमांचे उल्लंघन

पुरंदर तालुक्यातील शासकीय कार्यालयातच कोरोना नियमांचे उल्लंघन

सासवड

महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे संकेत WHO पासून सर्वच तज्ञ सांगत असताना देखील सासवड येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचारी कोरोना नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचारी कामाच्या वेळात मास्क न वापरता काम करीत आसतात. कोरोना वाढू नये म्हणून वेळोवेळी आरोग्य विभागा कडून कोरोना नियंत्रण समिती कडून मास्क व सॅनिटायझर वापरण्याचे आवाहन केले जात. आहे. मात्र सरकारी कर्मचारीच या नियमांचे उल्लंघन करत असल्याने नागरिकांनी आरोग्याची चिंता व्यक्त केली आहे.

विविध ठिकाणांवरून येणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी होत असून येथे कोणत्याही शासनाच्या नियमांचे पालन होत नसल्याने कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढेल्यास आश्चर्य वाटायला नको. सध्या कोरोना संसर्गामुळे सर्वत्र नियमाचे पालन केले जात आहे. मात्र पुरंदर दुय्यम निबंधक कार्यालय याला अपवाद ठरत आहे. तिथील कर्मचारी हे बिना मास्क कार्यालय मध्ये वावरत आहे. कोरोना चा एवढा मोठा धोका असून सुद्धा कर्मचारी कोणत्याही शासनाचे नियमांचे पालन केलेले दिसून येत नाही. येथील कर्मचाऱ्यांना कोरोना सुद्धा होऊन गेला आहे. दुय्यम निबंधक कार्यालयातले कर्मचारी व अधिकारी त्यांनी सगळे नियम कचऱ्याच्या डब्यात ठेवलेले आहेत.

     नागरिक पुरंदर तालुक्यात जमीन खरेदी विक्री साठी जिल्ह्यातून किंवा जिल्ह्याच्या बाहेरुन येत आहेत. दुय्यम निबंधक कार्यालयात कर्माचा-यांनीच मास्क फेकून दिल्याने कोरोनाला निमंत्रण देणार का? असा सवाल नागरिकांनी केला आहे. कोरोनाच्या या महामारीत अनेक लोक बाधित झाले. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अनेक संसार उदवस्त झाले. मात्र सरकारी कार्यालयांमध्ये मास्क न वापरल्याने व सोशल डिस्टन्सचा फज्जा महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय तसेच स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा आहे. संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई होणार का? किंवा कर्मचारी चुकी झाकण्याचा प्रयत्न वरिष्ठ अधिकारी करणार का? संबंधितावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *