पुरंदर
पुरंदर तालुक्यातील एखतपूर येथे बनावट कागदपत्र तयार करून तब्बल ४ कोटी ३५ लाख रुपये किंमतीचे २ हेक्टर ४६ गुंठे क्षेत्र फसवणूक करून आणि बनावट कागदपत्रे नावावर करून बळकवल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून याबाबतीत प्रदीप सलेकचंद अग्रवाल वय ५७ वर्षे,रा.एन.आय.बी.एम.रोड उंड्री पुणे यांनी फिर्याद दाखल केली आहे .
यासंदर्भात सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी कमलेश राजेंद्र बेताला, शकुंतला राजेंद्र बेताला, जीवन नेमीचंद बेताला, सपना जीवन बेताला सर्व रा. 33/275 महर्षी नगर पुणे 37 यांनी फिर्यादी प्रदीप सलेकचंद अग्रवाल व त्यांच्या पत्नी च्या मालकीची मौजे एखतपूर येथील गट नं. 65/1 मधील प्लॉट नं. 1 – 931.06 चौरस मीटर क्षेत्र व त्या क्षेत्रावर 2250 चौरस फुट रहिवासी बांधकाम तसेच, प्लॉट नं. 8 व 9 मधील 42051.10 चौरस मीटर क्षेत्र व आरसीसी बांधकाम 994 चौरस मीटर ही अंदाजे ४ कोटी ३५ लाखांची प्रॉपर्टि फसवून विश्वासघात करून खेरदी केले आहे.
तसेच एम.एस.ई.बी. सासवड मध्ये फिर्यादींच्या सहिचे खोटे बनावट कागदपत्र तयार करून सादर केले आहेत. या गटातील प्रदीप सलेकचंद अग्रवाल यांच्या मालकिच्या उर्वरीत क्षेत्राच्या वहिवाटीस अडथळा निर्माण करीत आहेत.
सासवड पोलिसांनी आरोपी कमलेश राजेंद्र बेताला, शकुंतला राजेंद्र बेताला, जीवन नेमीचंद बेताला, सपना जीवन बेताला सर्व रा. 33/275 महर्षी नगर पुणे 37 विरोधात गुन्हा दाखल केला असून सासवड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक राजेश माने करीत आहेत .