पुरंदर तालुक्यातील “या” रस्त्यावर अपघात झाल्याचे समजताच नागरिकांची घटनास्थळी धाव; दारुच्या बाटल्या पळविल्या

पुरंदर तालुक्यातील “या” रस्त्यावर अपघात झाल्याचे समजताच नागरिकांची घटनास्थळी धाव; दारुच्या बाटल्या पळविल्या

पुरंदर

बारामती जेजुरी रस्त्यावर दारूच्या बाटल्या घेऊन जाणाऱ्या टेम्पोंचा अपघात झाल्यानंतर बाटल्या गोळा करण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. आज (शुक्रवार) सकाळी कडेपठार नजीक हा अपघात झाला.

या घटनेबाबतची अधिक माहिती अशी की आज सकाळपासून बारामती जेजुरी रस्त्यावर पाऊस पडत होता.याच मार्गावरील मावडी कडेपठार जवळ दारूच्या बाटल्या घेऊन जाणारा टेम्पो घसरून पलटी झाला. या टेम्पो मधील असलेल्या सर्व बाटल्या आणि बाॅक्स रस्त्यावर पडले.

या अपघाताची माहिती परिसरात समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दारूच्या बाटल्या उचलण्यासाठी एकच झुंबड उडाली.

या ठिकाणी नुकतेच रस्त्याचे काम झाले आहे. काही अंतर डांबर प्रमाणापेक्षा जास्त टाकल्याने या ठिकाणी अपघात होत आहेत असे ग्रामस्थांनी सांगितले. काही दिवसापूर्वीच शिवशाही बसचा देखील अपघात झाला हाेता. ही बस घसरून रस्त्याच्या खाली गेली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *