जेजुरी
जेजुरी मोरगाव रस्त्यावर दिनांक 24 रोजी रात्री पाउने एकरा वाजण्याच्या सुमारास रुग्णवाहिकेची जोरदार धडक बसल्याने एका 50 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला.
याबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,शनिवार दिनांक 24 रोजी रात्री 10 वाजून 45 मिनिटांच्या दरम्यान मोरगाव कडून जेजुरी कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या रुग्णवाहिकेने एका अनोळखी व्यक्तीला जोरदार धडक दिली. या धडकेने सदर इसम 15 ते 20 फूट अंतरावर पडुन गंभीर जखमी झाला. उपचारापूर्वीच सदर अनोळखी व्यक्तीची मृत्यू झाला.
अपघाता नंतर रुग्णवाहिकेचां चालक निघून जात असताना येथील नागरिकांनी पोलिसांना फोन करून या चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिला. चालक अक्षय मोहन मोरे वय 26 रा मुरटी ता बारामती यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघात प्रकरणी पोलीस हवालदार नंदकुमार पिंगळे तपास करीत आहेत.
सदर अनोळखी मयत व्यक्ती बाबत कोणास माहिती असल्यास जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये संपर्क साधावा असे आवाहन जेजुरी पोलिसांनी केले आहे.