पुरंदर
पुरंदर तालुक्याच्या पश्चिम भागातील बोपगाव येथील कानिफनाथ मंदिर तसेच कडबानवाडी परिसरात घरगुती वापरासाठी असणारी लाईट तीन दिवसांपासुन नसल्याने महावितरणचा बेजबाबदार कारभार चव्हाट्यावर आला आहे.महावितरणने दखल न घेतल्याने मोबाईल चार्जिंग , टी.व्ही.मनोरंजनाची साधने बंद झाली आहेत . जेष्ठ नागरिक,शालेय,विद्यार्थी तसेच आॅनलाईन काम असणार्या व्यक्तींना मोठ्या ञासाला तोंड द्यावे लागत आहे.पीठाची गिरणी,घरात पाणी भरणे,मिक्सर,फ्रीज वापरता येण शक्य नसल्याने महिलावर्गाची तारांबळ उडत आहे .
महावितरण विभागातील वरिष्ठ प्रशासनाने दखल घेवून कायमस्वरुपी मार्ग काढण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे .
विनाअडथळा विजेसेवा देणे महावितरणचे कर्तव्य असताना तीन दिवसानंतरही वीजपुरवठा पुर्ववत न झाल्याने बेजबाबदार कारभार चव्हाट्यावर आला आहे . विजेअभावी दैनंदिन कामकाजात अडथळा निर्माण झाल्याने महावितरण विभाग दखल तरी केव्हा घेणार? असा संतप्त सवाल या भागातील ग्रामस्थांमधुन विचारला जात आहे .