पुरंदर
पुरंदर तालुका भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष विठ्ठल जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त 3 एप्रिल 2022 रोजी पुरंदर तालुक्यातील युवकांसाठी मोफत “एक दिवसीय ऊद्योजक उभारणी कार्यशाळा” वाटाड्या या महाराष्ट्रातील अग्रगण्य प्रशिक्षण आणि संशोधन प्रबोधनी च्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.
यामागील उद्देश एकच आहे की जे सुशिक्षित बेरोजगार युवक आहेत कींवा ज्यांना काहीतरी कमी भांडवलात अधीक नफा देणारा स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे अशा युवकां-युवतींना उद्योग कोणता चालू करावा ?भांडवल कसे ऊभारावे?विक्री व्यवस्थान कसे करावे?मार्केटिंग कसे करावे?सरकारी योजनांचा लाभ कसा घ्यावा? असे असंख्य प्रश्न असतात.
भविष्यात तालुक्यातील युवावर्ग सक्षम व्हावा,प्रगतीकडे जावा,समृद्धीकडे जावा यासाठी आरोग्य,शिक्षण,उद्योग,कला,क्रीडा,रोजगार या व अशा अनेक विषयांवर आपण पक्षाच्या माध्यमातून सक्रिय काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत,तरी याकामी निस्वार्थीपणे मदत आणि सहकार्य करणार्या अनेक युवकांची साथ हवी आहे ती साथ देण्यासाठी माझ्यावर विश्वास आणि प्रेम करणारे आपण सर्व समविचारी युवक ताकदीने माझ्या पाठीशी खंबीर उभे राहाल ही एकच इच्छा आणि अपेक्षा व्यक्त करतो : विठ्ठल रामचंद्र जगताप अध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा,पुरंदर, सदस्य ग्रामपंचायत,आंबळे
या कार्यशाळेच्या माध्यमातून या सर्व प्रश्नांवर सविस्तर मार्गदर्शन होणार असुन आपल्या परिसरात उभारता येवू शकतील अशा 30 ते 35 ऊद्योगांवर थोडक्यात प्रशिक्षण मिळेल,तसेच नवऊद्योजकांसाठीच्या सरकारी योजना,आवश्यक परवानग्या,यंत्रसामग्री खरेदि,प्रत्यक्ष प्रशिक्षण या सर्व विषयावर सविस्तर मार्गदर्शन वाटाड्याचे कार्याध्यक्ष डॉ विकास कुलकर्णी करतील.