पुरंदर
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील पोंढे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सर्वांना विश्वासात न घेता कारभार करत आहेत.त्यांच्या कारभाराची सखोल चौकशी करावी याबाबतचे निवेदन ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,पोंढे गावात ग्रामसेवक म्हणून कार्यरत असणाऱ्या ग्रामसेविका शशिकला नवले यांच्या कामकाजाबाबत काही चुका आमच्या निदर्शनास आल्या असून त्या आपणासमोर मांडू इच्छितो.
त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अन्यथा आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल.
ग्रामसेवक कार्यालयात येताना उशिरा येतात व लवकर जातात.आठवड्यातून कामकाजाच्या दिवसा पैकी कमी दिवस कार्यालयात उपस्थिती असते.
चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे गटविकास अधिकारी अमर माने यांनी सांगितले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छञपती शिवाजी महाराज व इतर थोर समाज सेवकांच्या जयंतीला दांडी मारतात.ग्रामसभेबाबत कार्यालयाच्या नोटीस बोर्ड वरती नोटिस लावली नसल्याचे निदर्शनास आले आहे.यामुळे बहुतांश ग्रामस्थांना ग्रामसभेबाबत माहिती मिळत नाही असे राजू वाघले यांनी सांगितले.
ग्रामसेविका कामावर उशिरा उपस्थिती लावतात,लवकर जातात तसेच महापुरुषांच्या जयंती ला दांडी मरतात.फोन उचलत नाहीत.त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. : राजू वाघले.
नुकतीच सोसायटीची निवडणूक पार पडली या निवडणुकीबाबत गावातील बहुतांश लोकांना कल्पना देखील मिळाली नाही.याबाबत त्यांची एककली भूमिका पाहायला मिळाली.या निवडणुकीची नोटीस ग्रामपंचायत नोटीस बोर्ड वरती लावली गेली नाही.पोच मात्र दिली गेली.
काही कामासाठी फोन केला असता फोन उचलत नाहीत.अशी माहिती राजू वाघले,संतोष वाघले,आकाश वाघले,तुळशीराम वाघले,मनोहर वाघले,युवराज वाघले यांनी दिली.